मंगळवार पासून पैसे नाही दिल्यास संचालक मंडळाच्या दारात करणार ठिय्या आंदोलन..!

मंगळवार पासून पैसे नाही दिल्यास संचालक मंडळाच्या दारात करणार ठिय्या आंदोलन..!

राजस्थानी मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा बैठकीत एकमुखी निर्णय..!



परळी वैजनाथ प्रतिनिधी

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी,परळी वैजनाथ यांचे कडून एक महिन्यापासून ठेवीदारांच्या रकमा देण्यास तारखेवर तारखा दिल्या जात आहेत. या प्रकारास कंटाळून गुरुवार रोजी ठेवीदारांची राजमाता जिजाऊ उद्यान परळी वैजनाथ येथे बैठक संम्पन्न झाली. संचालक मंडळाकडून मंगळवार दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी वाटप सुरू करण्याचा शब्द दिलेला गेला आहे. दिलेला शब्द पाळला नाही तर सर्व ठेवीदारांच्या वतीने संचालक मंडळाच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.बी


ड जिल्ह्यामध्ये एकापाठोपाठ एक मल्टीस्टेट व पतसंस्था बंद पडण्याचा सपाटा सुरु असून यामध्ये गोरगरीब, सर्वसामान्य, निवृत्त जेष्ठ नागरिक, छोटे छोटे व्यवसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. दररोज बँकेच्या दारामध्ये प्रत्येक ठेवीदारांच्या चकरा सुरु असून बँकेकडून ठेवीदारांना तारखेवर तारखा दिल्या जात आहेत. अनेकांच्या रोजच्या जगण्यावर याचा परिणाम झाला आहे. राजस्थानी मल्टिस्टेटचे संचालक मात्र आपापल्या व्यवसायामध्ये मग्न आहेत. आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत.. आता यापुढे आम्ही तारखेवर तारखा घेणार नाहीत.. आमचे रोजचे कामधंदे बंद पडले.. तुमचे पण कामधंदे बंद ठेवा.. असा पवित्रा या बैठकीमध्ये ठेवीदारांनी घेतला आहे.

संचालक मंडळांनी दिलेल्या वेळेत पैसे देण्यास सुरुवात केली नाही तर सर्व ठेवीदार संचालक मंडळाच्या दारात संवैधानिक मार्गाने ठिय्या आंदोलन करणार असल्याचा एकमुखी निर्णय या बैठकी दरम्यान घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अनेक मल्टीस्टेट व पतसंस्था या सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. अनेक गुंतवणूकदार देशोधडीला लागले असून पतसंस्था व मल्टीस्टेट च्या माध्यमातून नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने पुढे आले पाहिजे या मागणी करिता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषिमंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब यांना निवेदन देण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post