संभाजी ब्रिगेड येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार-जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे..
विशेष बैठकीदरम्यान नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या..
अंबाजोगाई प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा (पूर्व) ची विशेष बैठक दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई येथे संपन्न झाली. या बैठकीदरम्यान विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून संभाजी ब्रिगेडचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही येणाऱ्या काळात करणार असल्याचे मत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले. या बैठकीस संबोधित करत असताना बीड जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे म्हणाले की येणाऱ्या सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीनिशी लढवण्यास सक्षम असून आमचे सर्व पदाधिकारी तन, मन, धनाने निवडणुकीत उतरणार आहेत.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे, महासचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या आदेशानुसार व बीड जिल्हा संपर्कप्रमुख डॉक्टर सुदर्शन तारक सर, प्रदेश संघटक शशिकांत कन्हेरे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष ऍड.राहुल भैया वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेड अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी रवींद्र विक्रम ढगे यांची निवड करण्यात आली. अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्षपदी व्यंकट बंशीधर चव्हाण, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष पदी साक्षी सत्यनारायण कदम, विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी सतीश लिंबाजी कुंडगर यांची निवड करण्यात आली.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिशन मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस संभाजी ब्रिगेड बीड जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते नारायण मुळे, दत्तात्रय गंगणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनीताई यादव, अंबाजोगाई शहराध्यक्ष सिद्राम यादव, परमेश्वर मिसाळ, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष केशव टेहरे, परळी तालुकाध्यक्ष पांडुरंग मोरे, पृथ्वीराज सोनवणे, शिवम सुरवसे, कपिल टेहरे,रामलिंग शिरगिरे, नामदेव मुंडे यांची उपस्थिती होती.
पक्षाचे प्रोटोकॉल पाळणे,गाव तेथे शाखा, बूथ बांधणी, शहरातील वॉर्ड तिथे शाखा,संभाजी ब्रिगेडचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे, शेतकरी शेतमजूर यांच्या प्रश्नासाठी लढत राहणे याबद्दल बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी मार्गदर्शन केले. लवकरच केज तालुका व परळी तालुका दौरा करण्यात येणार असून या दोन्ही तालुक्याची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे व जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी सांगितले.






Post a Comment