अभिनंदन ! अभिनंदन!! अभिनंदन !!!
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारे आदर्श, साहित्य व सेवा गौरव शिक्षक पुरस्कार जाहीर..!
‘यंदा 15 शिक्षकांचा 17 सप्टेंबरला होणार गौरव’
परळी वैजनाथ प्रतिनिधी
मराठवाडा साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून यंदा पुरस्कारासाठी पंधरा शिक्षकांसाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती साहित्य परिषदेच्या या शाखेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव राजकुमार यल्लावाड, निवड समितीचे अध्यक्ष बंडू अघाव यांनी दिली. गेल्या आकरा वर्षापासून साहित्य परिषदेच्या वतीने परळी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या शिक्षकांचा परिषदेच्या वतीने गौरव केला जातो. याशिवाय साहित्य, सामाजिक कार्य या क्षेत्रातही काम करणार्या शिक्षकांना गौरविले जाते.
यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले परळी तालुक्यातील शिक्षक व त्यांच्या कंसात शाळा ः जमालखाँ पठाण (न्यू हायस्कूल, परळी), सुधीर गोस्वामी (जिजामाता विद्यालय, धर्मापुरी), प्रा. रामेश्वर सारडा (लिट्ल फ्लॉवर ज्यु.कॉलेज, परळी), सुनील गर्जे (श्री केदारी महाराज विद्या मंदिर, नंदनज),
अशोक नावंदे (जि.प.प्रा.शाळा, संगम), संतोष सुतार (जि.प.मा.शाळा नागापूर), गंगाधर बिरमोड (जि.प.प्रा.शाळा कासारवाडी), आत्माराम आघाव (जि.प.प्रा.शाळा मांडवा), शौकत पठाण (मिलिंद विद्यालय, परळी), करणसिंह चंदेल (जि.प.कें.प्रा.शाळा गाढेपिंपळगाव), संध्या नागुरे (विद्यावर्धिनी विद्यालय,परळी) यांची निवड करण्यात आली आहे तर यंदाच्या स्व.मोहनलाल बियाणी सेवागौरव पुरस्कारासाठी सुरेश पवार (आश्रमशाळा वसंतनगर तांडा), सौ.छाया देशमुख (न्यूहायस्कूल, परळी), सौ.बेबी आग्रे (जि.प.प्रा.शाळा, इंदपवाडी) यांची निवड निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या साहित्य गौरव पुरस्कारासाठी परळी येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार रानबा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव राजकुमार यल्लावाड, निवड समितीचे अध्यक्ष बंडू अघाव यांच्यासह अनंत मुंडे, अरुण पवार, संजय अघाव, सुनिता कोमावार, चेतना गौरशेटे व त्यांच्या सहकार्यांनी दिली.




Post a Comment