शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोर आपल्या हक्कांसाठी उतरली रस्त्यावर..!

शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोर आपल्या हक्कांसाठी उतरली रस्त्यावर..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

दिनांक-२५ सप्टेंबर २०२२ रोजी केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पोरांनी "ना कोणता पक्ष, ना कोणी नेता, आता लढायच आपल्या हक्कासाठी" अस सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत केज तालुक्यातील मौजे.ढाकेफळ येथे केज-अंबाजोगाई रोडवर ढाकेफळ, कुंबेफळ, चंदनसावरगाव, बनकरंजा, भाटुंबा, जानेगाव, पिसेगाव, कळमअंबा,सारणी, आनंदगाव, सोनीजवळा, पैठण, पात्रा, सावळेश्वर, जवळबन, होळ, केकतसारणी, उंदरी, बोबडेवाडी, आवसगाव सह परीसरातील शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं अग्रीम नुकसान भरपाई, गोगलगायी मुळे झालेल्या भाजीपाला शेतीची नुकसान भरपाई व पिवळा मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या सोयाबीनची नुकसान भरपाई आणि पिकविमा सरकारने तात्काळ मंजुर करावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.


या शेतकरी आंदोलनाचे शेतकऱ्याच पोरं म्हणुन अरविंद थोरात यांनी नियोजन केले तसेच हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी यामध्ये प्रा.डाॅ.हनुमंत सौदागर सर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कुलदिपजी करपे, छावाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे, कुंबेफळचे सरपंच किशोर तात्या, पैठणचे सरपंच ऋस्तुम चौधरी, पत्रकार मनोरामजी पवार, युवानेतृत्व महेश तपसे, पत्रकार सचिन साखरे, शाम चटप पाटिल, ओमकेश भैय्या नेहरकर, अशोक थोरात सर, रामेश्वर गायकवाड, संदिप पाटील, धनराज थोरात, प्रदिप थोरात, गणेश घाडगे, राहुल पाटिल, मयुर थोरात, विजय थोरात या शेतकऱ्यांनी व शेतकरी पुत्रांनी प्रतिनिधीत्व केले. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरच होती. या आंदोलनाच्या माध्यमातून आज शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोर आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरली होती....

Post a Comment

Previous Post Next Post