सरस्वती कन्या प्रशालेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..!
केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे
केज शहरांमध्ये नवरात्रीमहोत्सवा निमित्त माऊली विद्यापीठ केज संचलित सरस्वती कन्या प्रशालेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्सवात संपन्न नवव्या माळेच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानिमित्त कन्या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी आपली सांस्कृतीक कला सादर केली. त्यामध्ये टिपरी नृत्य, वैयक्तिक नृत्य, सांघिक नृत्य व देवीचा जागर या प्रकारची गीते सादर करण्यात आली, या कार्यक्रमासाठी परिसरातील पालक श्रीमती लोंढे मॅडम, श्रीमती मीरा गवळी मॅडम, श्रीमती मोरे मॅडम, श्रीमती सोरगेकर मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती शेख मॅडम, श्रीमती पारखे ताई इत्यादी पालक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कन्या प्रशालेच्या प्राचार्या तथा मुख्याध्यापिका घुले मॅडम यांनी भूषवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गंगणे सरांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद नेरकर सर, जोगदंड सर, मगर सर, गुंड सर, सुसंगे सर, सूर्यवंशी मॅडम, डोंगरे मॅडम सह शिक्षकेतर कर्मचारी सातपुते आणि घुले यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.


Post a Comment