संभाजी ब्रिगेड वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी अंबाजोगाई येथे जिल्हा आढावा बैठक संपन्न..!

संभाजी ब्रिगेड वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी अंबाजोगाई येथे जिल्हा आढावा बैठक संपन्न..!


अंबेजोगाई प्रतिनिधी

30 नोव्हेंबर रोजी संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिन नाशिक येथे संपन्न होणार आहे. वर्धापन दिनाच्या पूर्व तयारी बैठक अंबाजोगाई येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के सर तर प्रमुख मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर संभाजी ब्रिगेड परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज हे होते.


बैठकीमध्ये काही याबैठकी दरम्यान काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी परमेश्वर मिसाळ, तालुका उपाध्यक्ष पदी अतुल सुरवसे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी अंबाजोगाई तालुका उपाध्यक्षपदी सौरभ सुरवसे, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी कोषाध्यक्षपदी कोमल देशमाने, महिला आघाडी तालुका सहसचिव ममता माळी यांच्या निवडी करण्यात आल्या. तसेच या आढावा बैठकीमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के सर, संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे, संभाजी ब्रिगेड परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी यादव, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष सुनंदा लोखंडे, तालुका उपाध्यक्ष जमुनाताई सुरवसे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष संभाजीराव घोरपडे, जिल्हा सचिव नारायण मुळे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गंगणे, संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी परळी तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, जेष्ठ नेते सिद्राम यादव, सौरभ सुरवसे,अतुल सुरवसे, केशव टेहरे, संतोष कुंडगर, कोमल देशमाने यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post