भाजप तळागाळात पोहोचविणार-सुगंध गोदाम..!
भाजपच्या सोनपेठ सोशल मीडिया संयोजकपदी सुगंध गोदाम तर सरचिटणीसपदी जगन्नाथ यादव यांची निवड..!
सोनपेठ प्रतिनिधी
येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या सोनपेठ सोशल मीडिया संयोजक म्हणून सुगंध सूर्यकांत गोदाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सोनपेठ तालुका सरचिटणीस पदी जगन्नाथ यादव यांची निवड करण्यात आली यावेळी त्यांना निवडीबद्दल तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर व जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्त पत्र देत असताना पक्ष बळकटीसाठी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थेत पक्ष बळकटीसाठी पक्षाकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान नियुक्ती झाल्याबद्दल थोडक्यात आभार व्यक्त करताना नवनियुक्त सोनपेठ तालुका सोशल मीडिया संयोजक सुगंध सूर्यकांत गोदाम यांनी पक्षाच्या वाढीसाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले तसेच नरेंद्र मोदी यांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून तळागाळात पोहोचणार असल्याचे सांगितले यावेळी नियुक्तीपत्र देताना, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, जिल्हा सरचिटणीस शिवाजी मव्हाळे, युवा नेते कृष्णा सोळंके आदींची उपस्थिती होती. नवनियुक्त सोशल मीडिया संयोजक सुगंध सूर्यकांत गोदाम व सरचिटणीस जगन्नाथ यादव यांना अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





Post a Comment