'कल्पना' नव्हे, वास्तविक कविता लिहिणाऱ्या कवयित्री..!
वाढदिवस म्हणजे वयात एका वर्षांची वाढ! पण, ही केवळ वयाची वाढ असते असे नव्हे, कारण वयाबरोबर आपले विचार, व्यक्तीमत्व, स्वभाव, इत्यादींमध्ये अमुलाग्र बदल होत असतात. वाढदिवस बाजारातून केक विकत घेऊन कापन्यापुरता आणि चालू मेणबत्ती विजवण्यापुरता नक्कीच मर्यादित नसतो. त्यासोबत आपण केलेल्या विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भूमिकांचाही आदर, सन्मान असतो. तसेच, यातून वेगवेगळ्या नात्यातील बंध अधिक घट्ट करणाराही असतो. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन जातो, सांगता येत नाही. परंतु, कुठेतरी सामान्य माणूसही तितकाच महत्त्वाचा असतो हे देखील यानिमित्ताने लक्षात येते. असेच एक असामान्य, मेहनती, कर्तृत्ववान, आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे शिक्षिका कल्पना कल्याण घुगे. ज्यांच्या नावातच कल्पना आहे अशा उत्कृष्ट कवी लेखिका सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कल्पना घुगे यांचा आज वाढदिवस. विद्यार्थ्यांच्या कल्पना, कलागुणांना प्रोत्साहन देऊन, प्रेरणा देणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांचं कौतुक वाढदिवसाच्या निमित्ताने करण्याची संधी मिळाली आहे.
क्षेत्र कोणतेही असो त्यात झोकून देण्याची तयारी असली पाहिजे तरच आपण आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून पाय रोवून उभे राहू शकतो. एक शिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षका कल्पना घुगे. स्वकर्तृत्वाने, जिद्दीने आणि अथक मेहनतीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक कवयित्री उत्कृष्ट लेखिका म्हणूनही त्यांचं सामाजिक परिवर्तन करण्यात त्यांच लेखन उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रेरणा देणाऱ्या वास्तववादी लेखिका शिक्षिका म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजामध्ये लेखकांची कमी नाही परंतु काही मोजकेच लेखक वास्तववादी आणि परिवर्तनवादी लिखाण करतात. त्यामध्ये लेखिका कल्पना घुगे यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. वेगवेगळ्या प्रासंगिक विषयावर आणि सामाजिक शैक्षणिक विषयावर लेखन सुरू असतं. कवितेच्या माध्यमातून व्यवस्थेवर प्रहार करण्याची ताकद त्यांच्या कवितेत आहे.
लेखक कितीही परिवर्तनवादी लिखाण करीत असले तरी स्वतः परंपरेला चिकटून आहेत. हे वेगळं सांगण्याची गरज नाही .पण, केवळ लिहून ठेवणे आणि इतरांना परिवर्तन करा म्हणणं आणि आपण मात्र, परंपरेला चिकटून राहण किती विरोधाभास आहे हे अनेक लेखकांच्या विचारातून दिसतं. पण,या परंपरेला छेद देत युवा लेखिका म्हणून कल्पना घुगे यांच नाव समाजाभिमुख लेखिका म्हणून घेता येईल.सामाजिक बांधिलकी, फक्त कल्पना आणि बोलण्यात नाही तर कृतीतून दाखवून देणाऱ्या काही लेखिका कवयत्रींपैकी कल्पना घुगे या एक आहेत. त्यांच्या एकूणच आजवरच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आणि लेखनाचा गौरव, सन्मान अनेक राज्यस्तरीय संस्थांनी केलेला आहे.यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे महात्मा फुले राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार,हा पुरस्कार त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे जिल्हा स्तरावरील व राज्य स्तरावरील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सध्या सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात संशोधक विद्यार्थी आहेत. आज २३ जुलै त्यांचा त्यांचा जन्मदिवस यानिमित्ताने दैनिक मराठवाडा साथी व पीएम फाऊंडेशन परिवार यांच्या वतीने मनःपूर्वक अभिष्टचिंतन आणि पुढील यशस्वी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा! जिवेत्! शरद्!! शतम्!!!
औचित्य वाढदिवसाचे
अभिष्टचिंतन तुमचे





Post a Comment