ज्ञानबोधिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने पटकावले 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक..!

ज्ञानबोधिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने पटकावले 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक..!


परळी प्रतिनिधी

2024 फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत स्केट बोर्डिंग या खेळात भारताचे नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल. परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या व ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थीनी कु.श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने 1 ऑक्टोबर 2022 रोजी अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या कु.श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने स्केट बोर्डिंग या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.


कु.श्रद्धा रवींद्र गायकवाड हिचे प्राथमिक शिक्षण ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालयात झाले आहे. ही बाब शाळेसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची असून आमच्या शाळेचे व परळीचे नाव भारतभर केले आहे तिचे भारतभर होत असलेले कौतुक यामुळे आम्ही सर्व जण भारावून गेलो आहोत व अशी विधार्थिनी आम्हाला लाभली हे आमचे भाग्य आहे. तिच्या या यशा बद्दल शाळेचे सचिव/मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण मुंडे सर, आरसुळे सर, क्षीरसागर सर जाधव सर, आलापुरे सर, धुमाळ सर, चौंडे सर, गोपणपाळे सर, शेप सर, हैद्राबादे सर, सोनवणे सर, केंद्रे सर, नागरगोजे सर, राठोड सर, आंधळे सर, प्रशांत मुंडे सर, गवंडगावे सर, गरड सर, शेप कैलास सर, फड सर,पांचाळ सर, शिक्षिका सौ.मोती मॅडम, कराड मॅडम, शिंदे मॅडम, सूर्यवंशी मॅडम, कदम मॅडम, खोत मॅडम, नागरगोजे मॅडम, आघाव मॅडम, कटके मॅडम, कांबळे मॅडम, दगडगुंडे मॅडम, घोडके मॅडम, सिरसाट मॅडम, चिरके मॅडम, वाघमोडे मॅडम ,मुंढे मॅडम, अरसुडे मॅडम यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post