माणुसकीचा आधार फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..!

माणुसकीचा आधार फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे


केज येथे नवरात्र उत्सव निमित्त रविवार दि. 2/10/2022 रोजी सकाळी 6 ते दुपारी 01:00 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन माणुसकीचा आधार फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले होते. या वेळी या शिबिराचे उद्घाटन मा.नायब तहसिलदार श्री.देशपांडे साहेब यांचा हस्ते करण्यात आले, या वेळी जनविकास आघाडीचे हारूनभाई इनामदार, केज नगरपंचायत च्या विद्यमान नगराध्यक्षा सिताताई बनसोड, नगरसेवक भाऊसाहेब गुंड, सोमनाथ गुंड, बाळासाहेब गाडवे, भवानी माता मंदिर चे विश्वस्त टोपे परिवार या आयोजित शिबिर साठी उपस्थित होते.


या वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिरात विभागातील १५० पेक्षा अधिक महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये केज व केज च्या आजुबाजूच्या गावातील महिलांना HB%, ब्लडप्रेशर, मधुमेह, BMI तपासणी, दंत तपासणी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. त्या मधे ४ महिला रक्तक्षय (anaemia), ३ उच्च रक्तदाब, २ मधुमेहाच्या आढळून आल्या. त्यांना पुढील उचारासाठी संदर्भित करण्यात आले. काहींना किरकोळ औषधोपचार करण्यात आले. 

फाउंडेशन चे आमचे सर्व मित्र मंडळ डॉ.निखिल भालेराव, डॉ. विवेक डोईफोडे, प्रताप वैरागे, विकास गवळी सर, महावीर पटेकर, निलेश तोडकर, अजितदादा धपाटे, अमरभैया धपाटे, परमेश्वर बोबडे, योगेश वैरागे, डॉ.कृष्णा सूर्यवंशी, छोटा मावळा अथर्व गवळी आदींनी शिबिर संपन्न करण्यास परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post