सोयाबीन नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रति हेक्टरी अनुदान देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी..!
केज प्रतिनिधी
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपाने काढून घेतला गेला आहे. प्रामुख्याने सोयाबीनचे पीक या परतीच्या पावसाने पूर्णपणे नष्ट झाले असून दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांपुढे खूप मोठे संकट निर्माण झाले आहे. शेतात कापून ठेवलेले सोयाबीन परतीच्या प्रवासाने पाण्यात तरंगताना दिसत आहे.
काढणीला आलेले पिक डोळ्यासमोर नष्ट झाले असून पुरता शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. त्याकरिता राज्य सरकारने या बाबीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्यासाठी तात्काळ हातभार लावण्याची नितांत गरज आहे. कुठलाही विलंब न करता तात्काळ शेतकऱ्यांना अनुदानरुपी आर्थिक मदत करावी. सोयाबीन नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपये प्रति हेक्टरी अनुदान देण्याची संभाजी ब्रिगेडने तहसीलदार केज जिल्हा बीड यांच्याकडे मागणी केली आहे.




Post a Comment