ओंजळ..!
पंचवार्षिक कार्य अहवाल..!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारत मला नुकतेच पाच वर्ष पूर्ण झाले असून यानिमित्त पंचवार्षिक कार्यअहवाल पुस्तिका "ओंजळ" ची निर्मिती माझ्याकरवी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शहर अध्यक्ष म्हणून झालेली वाटचाल आणि "ओंजळ" ही पुस्तिका मी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना समर्पित करीत आहे.
आपले खंबीर नेतृत्व आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सहवासात आणि त्यांच्या तालमीत माझ्यासारख्या युवकाला राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. अगदी कमी वयात आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी माझ्यावर परळीच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. साहेबांचा विश्वास सार्थ करण्याची जीवनभर धडपड करण्याचा निर्धार केलेला मी सामान्य कार्यकर्ता असून या दृष्टीनेच देण्यात येणारी प्रत्येक जबाबदारी सर्वस्व अर्पण करून पार पाडण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. परळी शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करताना साहेबांच्या माध्यमातून विविध कामांचा अनुभव आला. जबाबदारीची जाणीव झाली. विविध विकासात्मक कामात खारीचा वाटा उचलता आला. यातच आपल्या जीवनाची धन्यता आहे अशी माझी प्रामाणिक भावना आहे.
23 ऑगस्ट 2017 रोजी आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या निर्देशशाने मला पक्ष संघटनेत परळी शहराचे शहराध्यक्ष पद देऊन जबाबदारी देण्यात आली. नगराध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर पक्ष संघटनेत परळी शहरातील महत्त्वाचे पद देण्यात आले. संघटनात्मक बांधणीचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय ना.अजित दादा पवार साहेब, खा.सुप्रियाताई सुळे, खा.सुनील तटकरे साहेब, ना.जयंत पाटील साहेब, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे साहेब, माजी जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे विद्यमान जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर आबा चव्हाण या दिग्गजांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना संघटनात्मक बाबींचे संस्कार झाले. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारातील 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण हे तत्व लक्षात घेऊन आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक, विकासात्मक, लोकहिताचे लोकोपयोगी उपक्रम राबवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरात पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
प्रत्येक व्यक्तीला पक्ष संघटना आपली वाटावी या दृष्टीने काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शहराध्यक्ष म्हणून केला आहे.आधार महोत्सव असो की सेवा सप्ताह, कोरोना काळातील सेवाधर्म असो की प्रत्येक माणसाच्या अडीअडचणीत रस्त्यावर उतरून खंबीर उभे राहून आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून असंख्य प्रश्नांची सोडवणूक व सामाजिक दायित्व निभविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
आज परळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष व प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक जाणिवेचा असल्याचा जनतेला विश्वास हीच या कामाची मोठी पावती आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना एकट्या परळी शहरातून विक्रमी अशी 21 हजार मतांची आघाडी मिळाली यातूनच परळी शहर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा गड बनल्याचे सिद्ध होते. तसेच शहरातील विविध संस्था, संघटना, चळवळी, सामाजिक कार्य या सर्व क्षेत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचाच सहभाग असतो. त्याशिवाय शहरातील कोणतीही कार्य पूर्ण होत नाही हीच राष्ट्रवादी काँग्रेसची व्याप्ती दाखवून देणारी बाब आहे. शहराध्यक्ष म्हणून पक्ष संघटनेच्या माध्यमातून केलेल्या विविध कार्याचा व उपक्रमांचा अल्प परिचय शीर्षस्थ नेतृत्वापर्यंत मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न करत आहे. आपल्या कौतुकाची थाप आम्हा कार्यकर्त्याच्या पाठीवर पडल्यानंतर उत्तरोत्तरही पक्ष संघटनात्मक कामात अग्रेसर राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नक्कीच नवी ऊर्जा प्राप्त होईल यात शंका नाही.
आपलाच
बाजीराव भैया धर्माधिकारी
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, परळी वैजनाथ जिल्हा बीड




Post a Comment