वादग्रस्त हर हर महादेव हा चित्रपट अंबाजोगाईत चालू दिला जाणार नाही-संभाजी ब्रिगेड..!

वादग्रस्त हर हर महादेव हा चित्रपट अंबाजोगाईत चालू दिला जाणार नाही-संभाजी ब्रिगेड..!



अंबाजोगाई प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर, बीड जिल्हा संपर्क प्रमुख डॉ.सुदर्शन तारख, विभागीय अध्यक्ष राहूल वायकर यांच्या आदेशावरून बीड जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर, जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली वादग्रस्त चित्रपट चालू दिला जाणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

वादग्रस्त हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित झाला असून ह्या चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची बदनामीकारक अशी प्रतिमा साकारण्यात आली असून यामुळे सबंध शिवप्रेमींच्या भावनेला ठेच पोहोचली आहे. हा चित्रपट अंबाजोगाई मध्ये चालू दिला जाणार नाही. शिवप्रेमींची भावना लक्षात घेऊन हा चित्रपट तात्काळ बंद करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने हा चित्रपट बंद केल्या जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेड कडून अंबाजोगाई चे तहसीलदार, पोलीस निरीक्षक व संबंधित टॉकीजच्या व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे.

प्रशासनास दिलेल्या निवेदनावर संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अश्विनीताई यादव, महिला आघाडी अंबाजोगाई तालुकाध्यक्ष सुनंदाताई लोखंडे, तालुका उपाध्यक्ष जमूनाताई सुरवसे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गंगणे, जेष्ठ नेते सिद्राम यादव, पोपटराव लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post