हिवरा खुर्द येथे ग्राम ऊर्जा जगावणारा महिला दिन साजरा..!
बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे
आज ग्रामऊर्जा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कर्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणुन मा. विद्याताई रुद्राक्ष, सेंद्रिय शेतकरी व व्यावसायिक या होत्या. विद्याताईंनी महिलांनी स्वतःच्या पायावर कसे उभा राहता येईल, व्यवसायाची सुरवात छोट्या स्तरातून कशी करता येईल तसेच व्यवसायातील उत्पादित मालाची मार्केटिंग कशी करता येईल अशा अनेक विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. ग्रामऊर्जा फाउंडेशन च्या प्रेरणा शिलवंत यांनी व्यवसायाची सुरवात कशी करावी त्यातुन कुटुंबाला आधार कसा देता येईल, मुलींचे शिक्षण त्याच बरोबर पुरुषांनी महिलांना या कामात कसा हातभार लावावा यावर मार्गदर्शन केले. उपसरपंच चंद्रकांत साखरे यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांनी आता पुढे येऊन आपल्या घराला आर्थिक बाजूने सक्षम करण्यासाठी पुढे येणाची गरज आहे या साठी ग्रामपंचायत कडून लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुर्गे सर यांनी केले व सूत्रसंचालन संजीवनी गुळभिले यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सरपंच महेश उजगरे, जि.प.प्रा.शाळाचे मुख्यध्यापक लोखंडे सर, सी.आर.पी.कविता साखरे, ST वाहक सारिका काकडे, स्टाफ नर्स सुमित्रा गिराम, आशा वर्कर हेमा ताई, अंगणवाडी ताई रुक्मिणी साखरे, सुनीता गरड, ग्रामऊर्जा चे वैजनाथ इंगोले, दत्तात्रय शिंगाडे व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment