खांडवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन..!
गेवराई प्रतिनिधी
सामाजिक परिवर्तनाला गती देणारे, आरक्षणाचे जनक, लोक कल्याणकारी राजे, समताधिष्टित लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवी येथे स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोर भोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाच्या अनुषंगाने किशोर भोले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर जुगदार सर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकुन गावकरी व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमास शाळेचे जोशी सर युवा नेतृत्व राहुल कोकाटे अभिजित भोले ऋतिक भोले संजय कोकाटे सुभाष पवार सह नागरिक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे अभार प्रदर्शन शाळेचे जोशी सर यांनी केले.




Post a Comment