चिंचोली माळी जिल्हा परिषद गटात विष्णु चाटे विरुद्ध विष्णु घुले..!
(विष्णु घुले यांना विष्णू चाटे पडणार भारी)
केज/बीड जि.प्रतिनिधी सचिन साखरे
केज तालुक्यातील चिंचोली माळी जिल्हा परिषद गटात सध्या बजरंग सोनवणे हे जिल्हा परिषद सदस्य आहेत व बजरंग सोनवणे यांना अंतकरणातुन मानणारा वर्ग आहे. बजरंग सोनवणे यांनी चिंचोली माळी सर्कलचा विकास जे भाजपचे रमेशराव आडसकर पंचवीस वर्षांत करू शकले नाही त्या पेक्षा दहा पटीने विकास बजरंग सोनवणे यांनी केलेला त्यामुळे चिंचोली माळी सर्कल मध्ये बजरंग सोनवणे यांचे जनतेच्या मनावर वर्चस्व कायम झाले आहे.
त्यामुळे चिंचोली माळी जिल्हा परिषद गट जर ओबीसी साठी सुटला तर केज तालुक्यातील चिंचोली माळी जिल्हा परिषद गटात विष्णु चाटे विरुध्द विष्णु घुले ही एक हाय प्रोफाइल लढत होण्याची शक्यता आहे. चिंचोली माळी जिल्हा परिषद गटात रमेश आडसकर यांची पन मोठी ताकद आहे विष्णु घुले यांच्या पत्नी टाकळी पंचायत समिती गणाच्या सदस्य व पंचायत समिती सभापती आहेत परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी टाकळी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये विष्णू घुले यांचा मोठा पराभव झाला आणि चिंचोली माळी जिल्हा परिषद गटावरचे बरेच वर्चस्व कमी होताना दिसत आहे विष्णु चाटे हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अंत्यत जवळ चे मानले जातात आणि विष्णू चाटे वाल्मिक कराड यांचे मावस भाऊ पन आहेत त्या मुळे विष्णु चाटे यांना मोठी ताकद मिळणार आहे.चिंचोली माळी जिल्हा परिषद गटात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना जितका माणनारा वर्ग आहे तितकाच चिंचोली माळी जिल्हा परिषद गटात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना तितका माणनारा वर्ग आहे त्यामुळे ही लढत जर झालीतर केज तालुक्यातील एक मोठी लढत होईल आणि बजरंग सोनवणे हे विष्णु चाटे यांच्या साठी मोठी ताकद लावतील अशी लढत जर झालीतर चिंचोली माळी जिल्हा परिषद निवडणूक विष्णु घुले यांना इतकी सोपी जाणार नाही.




Post a Comment