परळीतील विद्यार्थ्यांचे मिळवलेले यश कौतुकास्पद-डॉ.संतोष मुंडे..!

नीट परीक्षेत मराठवाड्यात प्रथम आलेल्या पलक जाजू तसेच पार्थ कराड, आरुषी रांदड व आकांक्षा नागरगोजे यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते सत्कार..!




परळीतील विद्यार्थ्यांचे मिळवलेले यश कौतुकास्पद-डॉ.संतोष मुंडे..!


परळी वैजनाथ प्रतिनीधी

नीट  परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून परळी वैजनाथ येथील पलक जाजू या विद्यार्थिनीने मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर पार्थ कराड, आरुषी रांदड व आकांक्षा नागरगोजे यांनी नीट परिक्षेत घवघवीत  यश संपादन केले त्याबद्दल  दिव्यांगांचे नेते व राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. परळी वैद्यनाथ ही गुणवान रत्नांची खान असुन जिद्द व चिकाटीने परळीतील विद्यार्थी देशपातळीवर यश संपादन करत आहेत.विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद असल्याचे डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले.



परळी वैद्यनाथ शहरातील विद्यार्थी यांनी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या नीट परीक्षेत परळी वैजनाथ येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. श्रीकांत जाजू यांची कन्या पलक श्रीकांत जाजू ही विद्यार्थीनीने 720 पैकी 705 गुण घेऊन मराठवाड्यातून प्रथम आली आहे. याच परीक्षेत डॉ.बालासाहेब कराड व सौ.शालीनी बालासाहेब कराड यांचा मुलगा पार्थ कराड याने 720 पैकी 680 गुण मिळविले आहेत. डॉ.विजय रांदड यांची कन्या आरुषी रांदड हिने 720 पैकी 648 गुण तर मांडेखेल येथील  बालासाहेब नागरगोजे यांची कन्या आकांक्षा नागरगोजे हिने 720 पैकी 597 गुण घेऊन नीट परीक्षेत घवघवीत यश मिळविले याबद्दल देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक वैद्यनाथ प्रभूंची प्रतिमा भेट देऊन  डॉ.संतोष मुंडे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. परळीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत प्रथमच मोठे यश मिळाले असून या यशामुळे परळीचा शैक्षणिक दृष्टीकोनातून नावलौकीक वाढला आहे. यावेळी बोलताना डॉ.संतोष मुंडे म्हणाले की, परळी सारख्या भागातून अथक परिश्रमाच्या बळावर विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहेत. नीट परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे. परळी शहरातही अनेक शैक्षणीक संस्था विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहेत. परळी शहर व परिसरातुन घडत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्वल यशासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करु असेही डॉ.संतोष मुंडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ.संतोष मुंडे यांच्यासह प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.राजेंश जाजू,  दंतरोग तज्ञ दिनेश लोढा, संगम येथील सामाजिक कार्यकर्ते हरिष नागरगोजे, सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे, सामाजिक कार्यकर्ते विजय गीते, साप्ताहिक परळी वार्ताचे संपादक विद्याधर सिरसाट आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post