विद्यमान आमदार, पती अनं सासऱ्याच्या बातम्यांवर केज पत्रकारांनी टाकला बहिष्कार..!

विद्यमान आमदार, पती अनं सासऱ्याच्या बातम्यांवर केज पत्रकारांनी टाकला बहिष्कार..!


केज/बीड जि.प्रतिनिधी सचिन साखरे

आज केज तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने दैनिक पुण्यभूमीचे संपादक बाळासाहेब मस्के व केज तालुका प्रतिनिधी रोहन गलांडे यांच्यावर केज मतदार संघाच्या विद्यमान आमदार यांच्या विकास कामा संदर्भात दैनिक पुण्यभूमीने जनतेतून उमटलेल्या प्रतिक्रियेचे वृत्त प्रकाशित केल्यामुळे आ.नमिता मुंदडा, त्यांचे पती अक्षय मुंदडा, सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी केज पोलिस प्रशासनावर दबाव टाकून त्यांच्या एका सासऱ्यांच्या कार्यकर्ताला पुढे करून संपादक बाळासाहेब मस्के व केज प्रतिनिधी रोहन गलांडे यांच्यावर केज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तसे पाहिले तर बातमीच्या विरोधामध्ये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करता येत नाही तर मा.न्यायालयात मानहानीचा दावा करता येतो. मात्र आमदारांच्या दबावामुळे केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमत: हा गुन्हा मागे घ्यावा कारण ऐनसीर गुन्हात कुठलेही तथ्य नाही ऐका संपादक व पत्रकारावर गुन्हा दाखल होने हा सगळा विद्यमान आमदाराचा दबाव तंत्राचा प्रकार लक्षात घेता केज तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने गुन्हाचा निषेध करत विद्यामान आमदाराच्या बातम्यावरती केज तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने आज पासून बहिष्कार टाकण्यात आला आहे असे पत्रकार बांधवांच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post