मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी परळी वकील संघासह विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा..!

मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी परळी वकील संघासह विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा..!


परळी वै. प्रतिनिधी

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धरणे, आंदोलने, रास्ता रोको आदी प्रकारची आंदोलने मोठ्या प्रमाणात होत आहेत. याचाच एक भाग म्हणून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाज 2 सप्टेंबर 2023 पासून ठिय्या आंदोलनास बसला आहे. या आंदोलनास सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आज दि 5 सप्टेंबर 2023 रोजी परळी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन ठिय्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. दिवसेंदिवस परळी येथील आंदोलनाची धार मोठ्या प्रमाणात वाढत असून विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे.


आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेष्ठ नेते बाळासाहेब देशमुख मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सेक्रेटरी ऍड अजय बुरांडे, पांडुरंग राठोड, अखिल भारतीय किसान सभा जिल्हा सेक्रेटरी मुरलीधर नागरगोजे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड विष्णुपंत सोळंके, वडखेलचे पोलीस पाटील शिवाजीराव बोडके, तालुका अध्यक्ष मुक्तेश्वर कडभाने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख श्रीकांत पाथरकर,शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर,उपाध्यक्ष ऋषिकेश बारगजे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अंकुशराव जाधव, शहराध्यक्ष संदीप काळे, शिव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ गव्हाणे, ओबीसी चे ज्येष्ठ नेते प्रा. टी. पी. मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेत्या सुदामतीताई गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ नेते समद शेठ, अखिल भारतीय छवा संघटना जिल्हाध्यक्ष विशाल श्रीरंग, पोहनेर ग्रामपंचायत सरपंच नितीन काकडे, दिग्रसचे मा सरपंच सुभाष नाटकर, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष पांडुरंग मोरे, शेलु शाखा अध्यक्ष वेंकटेश बदले, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष दशरथ दादा इंगळे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष राजेश सरोदे, महासचिव ज्ञानेश्वर गीते, उपाध्यक्ष अवि मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर कार्याध्यक्ष महबूब कुरेशी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम आगळे, कौडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच दिलीपराव राठोड, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन तुकाराम गव्हाणे, वैजनाथ भक्ती मंडळ मुंबई चेंबूरचे अध्यक्ष वाल्मीक गोलर, श्रीकृष्ण लुगडे बालाजी गिराम, ज्ञानेश्वर फपाळ, दिनेश जुगल, दौंडवाडी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पारसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका युवक कार्याध्यक्ष शुभम नागरगोजे, गोपाळ इचके, किरण पारशी, अतुल शिंदे, सतीश शिंदे, यशवंत शिंदे, स्वराज्य संघटना बाबा इंगळे, मिरवट सेवा सहकारी सोसायटी चेअरमन हनुमान इंगळे, दादा हरी वडगाव माजी सरपंच भास्कर बापू शिंदे, भिलेगाव गावकरी माणिकराव कडबाने, देविदास वाव्हळे, वानटाकळी ग्रामपंचायत उपसरपंच एकनाथ घाडगे रामराव आदींनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून आपला पाठिंबा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post