कामगार कल्याण बालनाट्य स्पर्धेत परळीच्या अश्वमेध नाट्य संघाचे 'एलियन्स द ग्रेट' नाटक प्रथम..

कामगार कल्याण बालनाट्य स्पर्धेत परळीच्या अश्वमेध नाट्य संघाचे 'एलियन्स द ग्रेट' नाटक प्रथम..


सोबतच दिग्दर्शन प्रथम व अभिनय द्वितीय ही पारितोषिके पटकावली..


परळी वैजनाथ प्रतिनिधी

लातूर येथे पार पडलेल्या कामगार कल्याण केंद्राच्या गटस्तरीय बालनाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र बीड यांच्या सौजन्याने परळीतील अश्वमेध नाट्य संघाच्या बालकलाकारांनी प्रथम बक्षीस मिळवत बाजी मारली आहे.

श्री.धनंजय सरदेशपांडे लिखित 'एलियन्स द ग्रेट' या नाटकाचे सुंदर सादरीकरण करून चिमुकल्यांनी रसिकांची वाहवा मिळवली.या नाटकातील विठ्ठल या भूमिकेसाठी चि.राजवीर बालासाहेब शिंदे' याला अभिनयाचे द्वितीय पारितोषिक आणि नाटकाच्या दिग्दर्शनासाठी श्री.महेश ज्ञानोबा होनमाने यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. या नाटकाचे सह दिग्दर्शन श्री.शिरीष तिर्थकर यांनी केले. तसेच कु.सोनाली डोंगरे यांनी संगीत, श्री.दिनेश कदम यांनी नेपथ्य, श्री.प्रशांत पांडे यांनी रंगमंच व्यवस्था, श्री.संतोष कापावार यांनी वेशभूषा आणि सौ. रोहिणी होनमाने यांनी रंगभूषा सांभाळली.

या नाटकात बालकलाकारांनी खालील भूमिका साकारल्या.

कैवल्य : आयुष संतोष पिसे
चारू : प्रतीक सुधीर मुंडे
संकेत : आदिनाथ पुरुषोत्तम यादव
तन्वी : अनुष्का राजेंद्र सुरवसे 
शारदा : अक्षरा सारंग धर्माधिकारी 
एलियन १ : विक्रम बालासाहेब सरवदे
एलियन २ : शर्वरी संतोष कापावार 
एलियन ३ : श्रीकृष्ण अभिमन्यू भिसे
पत्रकार : ओमसाई संतोष कापावार 
विठ्ठल : राजवीर बाळासाहेब शिंदे
गुडमाकायलो : श्रीयांश अशोक सुळ

आयुष्यात पहिल्यांदाच रंगमंचावर उभा टाकणाऱ्या या सर्व बालकलाकारांनी हे अभूतपूर्व यश प्राप्त केल्यामुळे शक्तीकुंज वसाहत व परळी परिसरातून या चिमुकल्यांवर आणि अश्वमेध नाट्य संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post