संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने तालुकास्तरीय शालेय नृत्य स्पर्धा आयोजित..
केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे
केज तालुक्यातील संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संघर्ष सांस्कृतिक मंच २०२४ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम तालुकास्तरीय शालेय नृत्य स्पर्धा आयोजित केली आहेत रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी सायं.५:०० वा हा कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर लगेच बक्षीस वितरण होणार आहे. प्रथम पारितोषिक ७७७७/रु, द्वितीय पारितोषिक ५५५५/-रु, तृतीय पारितोषिक ३३३३/-रु, व सन्मानचिन्ह सदरील कार्यक्रम हा पंचायत समिती मैदान केज या ठिकाणी आयोजित केला आहे. संघर्ष पत्रकार संघ केज मार्फत गेल्या वर्षापासून पत्रकारितेबरोबरच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध सातत्यपूर्ण व समाज हिताचे यशस्वी कामकाज चालू असून याचाच एक परिपाक म्हणून सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा वाढता मोबाईलचा वापर टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांचा उपजत कलागुणांना वाव मिळण्यासाठी व संस्कृतीची जतन होण्यासाठी संघर्ष पत्रकार संघाचा एक अनोखा उपक्रम संघाचा वार्षिक महोत्सव म्हणून दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे यामध्ये प्रामुख्याने शालेय गटातून नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे.
नियम व अटी स्पर्धेसाठी पंचांचा निकाल अंतिम राहील, प्रत्येक शाळेतून एक संघ किंवा वैयक्तिक स्पर्धक नोंदीला जाईल, स्पर्धेसाठी निवडलेल्या गाण्याची ऑडिओ क्लिप किमान दोन दिवस अगोदर देणे बंधनकारक आहे, वेशभूषा व मेकअप साठी लागणारे साहित्य स्वतः उपलब्ध करणे, दिनांक २६जानेवारी २०२४ पर्यंत आपल्या शाळेचा सहभाग नोंदवावा. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष अनिल गलांडे ९५५२९२७६३५ व अध्यक्ष श्रीराम तांदळे ९११२४६७२२० व इतर सदस्य यांनी केले आहे.

Post a Comment