सनराईज इंग्लिश स्कुलचे स्नेह संमेलन 12 फेब्रुवारी रोजी रंगणार..

सनराईज इंग्लिश स्कुलचे स्नेह संमेलन 12 फेब्रुवारी रोजी रंगणार..

ख्यातकीर्त प्रेरक वक्ते डॉ.विठ्ठलराव लहाने यांचे हस्ते होणार उद्घाटन..


परळी वै.प्रतिनिधी

येथील परिवर्तन युवा मंच संचलित सनराईज इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार दि.12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:00 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती संचालक गोविंदराव मुंडे यांनी दिली. वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ख्यातकीर्त प्लास्टिक सर्जन तथा प्रेरक वक्ते डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे हस्ते होणार असून परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे अध्यक्ष म्हणून उपस्थिती असणार आहेत.

वार्षिक स्नेह संमेलन प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त लेखक-दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे ग्लोबल आडगाव फेम लेखक-दिग्दर्शक, डॉ.सिद्धार्थ तायडे, परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पं.स.परळीचे संचालक बालाजी मुंडे, सामाजिक कार्यकर्ते माणिकभाऊ मुंडे उपस्थित राहणार आहेत.वार्षिक स्नेह संमेलनाचे लाईव्ह प्रसारण यूट्यूबवरही होणार आहे.

वार्षिक स्नेह संमेलनाचा आनंद घेण्यासाठी सर्व विद्यार्थी पालक आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शालेय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post