संचालक मंडळ तुपाशी..ठेवीदार मात्र उपाशी..

राजस्थानी व ज्ञानराधाच्या ठेवीदारांचे अंबाजोगाई येथे उपोषण सुरु..

संचालक मंडळ तुपाशी..ठेवीदार मात्र उपाशी..


अंबाजोगाई प्रतिनिधी

येथील राजेस्थानी व ज्ञानारधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली.च्या ठेवीदारांनी ठेवी मिळतील याची शक्यता दिसत नसल्याने चार महिने वाट बघून अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.



शाखेच्या ठेविदाराणी स्वतःची होत असलेली कुचंबणा पाहता बँकेस व प्रशासकीय कार्यालयास उपोषणापूर्वी निवेदने देऊन सोमवार दि.26.2.24 रोजी उप जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निवेदन देत 82 ठेवीदार उपोषणास बसले आहेत. 

ठेवीदारांच्या व्यथा फार गंभीर झाली आहे. स्वतःचा पैसा असून ठेवीदारांची अवस्था "न घरका, न घाटका" अशी झाली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यातून बाहेर येण्यासाठी शासन दरबारी याची कुणी नोद घेईल का? अशा प्रकारास अळा बसेल का ? पैसे परत मिळतील का? असे अनेक प्रश्न ठेविदारासमोर आ वासून उभे आहेत.
आमच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सुरु केलेले उपोषण ठेवी मिळाल्या शिवाय थांबवणार नसल्याचे ठेवीदारांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post