अपकी माँगे पुरी करुंगा और मरते दम तक आपका साथ निभाऊंगा..

अपकी माँगे पुरी करुंगा और मरते दम तक आपका साथ निभाऊंगा..


बजरंग सोनवणेंची ईद ए मिलाप कार्यक्रमात मुस्लिम समाजबांधवांना ग्वाही..


बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे 

लोकसभा चूनाव में चूनके आने के बाद इस जिले का सांसद बनुंगा. तब मै अपकी जो माँगे है, वो पुरी कर दूंगा. और मैं मरते दम तक आपके साथ रहुंगा. अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीड येथे माजी आमदार सय्यद सलिम यांनी आयोजित केलेल्या ईद ए मिलाप कार्यक्रमात मुस्लिम समाजबांधवांना दिली.


बीड शहरातील गॅलेक्सी फंक्शन हॉल येथे सोमवारी माजी आमदार सय्यद सलीम यांनी आयोजित केलेल्या ईद ए मिलाप निमित्त कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षिरसागर, माजी आमदार सिराज देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, मुस्लिम बांधवांसाठी शिक्षण व आरोग्य व्यवस्थेसाठी काम करणार आहे. हे काम करण्यासाठी भाजप खासदार अपयशी ठरल्या आहेत. असा आरोप ही त्यांनी केला. या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

 कोचिंग क्लासेस चालकांची घेतली बैठक


इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोमवारी रात्री बीड शहरातील सर्व कोचिंग क्लासचे संचालकांची भेट घेऊन बैठक घेतली. सरकारने क्लासेस चालकांना घालून दिलेल्या १६ वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये प्रवेशास बंदी, विद्यार्थ्यांना फिसची पावती देणे बंधनकारक, सकाळी ६ वाजेपुर्वी व रात्री ७ वाजेनंतर कोचिंग क्लासेसचे वर्ग घेण्यास मनाई अशा अटी व नियम रद्द करण्यात यावेत अशी मागणी क्लासेस संचालकांची यावेळी केली त्यांच्या एकूणच अडचणींबाबत सोनवणे यांनी चर्चा केली व याप्रश्नी निवडून आल्यानंतर सर्वच स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन दिले

Post a Comment

Previous Post Next Post