खा.रजनीताई पाटील आणि बजरंग बप्पा सोनवणे यांची भेट..

खा.रजनीताई पाटील आणि बजरंग बप्पा सोनवणे यांची भेट..


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

राष्ट्रीय कॅांग्रेस पक्षाच्या नेत्या तथा राज्यसभा सदस्य खासदार सौ. रजनीताई अशोकराव पाटील यांची केज येथील “शिवनेरी” निवासस्थानी भेट घेवून त्यांचे आशिर्वाद घेतले. 

दि. १५ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि इंडिया विकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केज येथे काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटी सदस्य तथा खा सौ रजनीताई पाटील यांची त्यांच्या शिवनेरी निवस्थानी भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, केजचे माजी नगराध्यक्ष आदित्यजी पाटील, काँग्रेसचे बीड जिल्हाउपाध्यक्ष राहूलजी सोनवणे, मा. नगरसेवक पशुपतीनाथ दांगट आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post