परळी शहरात गोळीबार; सरपंच जागीच ठार, एक जखमी..

परळी शहरात गोळीबार; सरपंच जागीच ठार, एक जखमी..


परळी-वै. प्रतिनिधी 

शहरातील बँक कॉलनी भागात आज रात्री झालेल्या गोळीबारात परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे युवा सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला तर ग्यानोबा गित्ते जखमी झाल्याची माहिती आहे.  घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. बँक कॉलनी परिसरात ही थरारक घटना घडली.

दरम्यान, गोळीबार कोणी केला याबाबत अद्याप पोलिसांकडून याबाबत ठोस  माहिती मिळालेली नाही. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून परळी पोलीस पुढील तपास करित आहेत. जखमी ग्यानोबा गित्ते यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post