मराठा बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नती करता सर्वार्थाने पूर्णवेळ प्रयत्नशील असणारा 72 वर्षांचा योद्धा-पुरुषोत्तम खेडेकर साहेब..!

मराठा बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नती करता सर्वार्थाने पूर्णवेळ प्रयत्नशील असणारा 72 वर्षांचा योद्धा-पुरुषोत्तम खेडेकर साहेब..!


विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात अंत्री खेडेकर या गावी दिनांक ०४ जानेवारी १९५० या दिवशी एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात पुरुषोत्तम खेडेकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच हुशार आणि चौकस बुद्धीचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम केले. नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरल्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर यांना एकसंधपणे राहणाऱ्या मराठा बहुजन समाजामध्ये सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय-शैक्षणिक आदी बाबतींत भिन्नता असल्याची जाणीव झाली. याच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीकरता प्रस्थापित व्यवस्थेपेक्षा वेगळा प्रवाह तयार करावा लागेल या जाणिवेतून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी ०१ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे आपल्या शासकीय-प्रशासकीय सेवेतील जवळपास २०० कर्मचारी-अधिकारी सहकाऱ्यांसमवेत मराठा सेवा संघाची स्थापना केली.

माँसाहेब जिजाऊंना सर्वोच्च स्थानी ठेवून स्थापन झालेल्या मराठा सेवा संघाच्या अंतर्गत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांसह विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या 33 कक्षांची निर्मिती पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केली.मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेल्या ३० वर्षांपासून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी प्रचंड योगदान दिले आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा ओबीसीकरण हा एकमेव ठोस पर्याय आहे असे पुरुषोत्तम खेडेकर साहेब जवळपास गेल्या तीस वर्षांपासून सांगत आहेत. अलीकडील काळात त्यांची ही सूचना जवळपास सर्वांनीच मान्य केली आहे. जिजाऊंचे जन्मगाव असलेले सिंदखेडराजा या क्षेत्राचा विकास करून तिथे जिजाऊ सृष्टी सारखा जागतिक दर्जाचा प्रकल्प उभा करण्याचे काम पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हाती घेतले आहे. आज ते काम पूर्णत्वास जात आहे.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या माध्यमातून उभा राहत असणारा सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी हा प्रकल्प येणाऱ्या काळात नक्कीच जागतिक पर्यटनाचे केंद्र होईल. १२ जानेवारी चा सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मोत्सव,त्यावेळी लाखो अनुयायांची तिथे गर्दी जमणे,एका दिवसात कोट्यावधी रुपयांच्या पुस्तकांची खरेदी-विक्री होणे, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या एका नावाखाली समस्त मराठा-बहुजन समाज एकसंध राहणे, मराठा सेवा संघाच्या आणि संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे महाराष्ट्रातील जातीय-धार्मिक द्वेष कमी होऊन दंगलीही कमी होणे या सर्वसामान्यांच्या कल्पनेतील गोष्टी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी प्रत्यक्षात करून दाखवल्या आहेत आणि समाजामध्ये एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या अथक परिश्रमामुळे मराठा सेवा संघ केवळ एक संघटना न राहता एक व्यापक चळवळ तयार झाली आहे.भविष्याचा वेध घेत हरक्षणी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करत तो विचार पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्णवेळ अथक परिश्रम घेण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे त्यांची समाजात आज युगनायक-युगपुरुष म्हणून वेगळी ओळख तयार झाली आहे.

वरील फोटो दिनांक २३ जुलै,२०२२ रोजी खेडेकर साहेबांच्या
सोलापूर जिल्हा दौऱ्याच्या वेळी घेतलेला आहे.bसाहेबांच्या उजव्या पायाच्या एका हाडाचे ऑपरेशन झालेले आहे.पायाची जखम ताजी आहे.पायाला पट्टी आहे.तरीही ऑपरेशन नंतर फक्त आठवडाभराच्या विश्रांतीनंतर लगेचच साहेबांनी पूर्वनियोजित दौऱ्याला सुरुवात केली.कोणत्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेला हा दौरा नाही तर अविरतपणे काम करण्याची त्यांची सवय त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळेच त्यांनी समाजाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक समस्या जाणून घेण्यासाठी पूर्वनियोजित दौरा रद्द न करता पुढे चालू ठेवला. वयाच्या ७२ व्या वर्षी पायाच्या हाडाचे ऑपरेशन झालेले असताना, पायाला जखम असताना, पायाला पट्टी बांधलेली असताना केवळ समाजासाठी आणि आपल्या अनुयायांसाठी अविरतपणे काम करणारा हा संघर्ष योद्धा खूप काही सांगून जातो.

शंकर नामदेव नागणे 
संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी 
८९८३०६९१०४

Post a Comment

Previous Post Next Post