युवा नेते सुशील आप्पा कांबळे यांचा शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश..!

युवा नेते सुशील आप्पा कांबळे यांचा शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश..!


बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

शिवसंग्राम चे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बार्शी नाका प्रभाग क्रमांक 25 मधील युवा नेते सुशील आप्पा कांबळे यांचा बुधवार 20 जुलै रोजी शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश झाला बीड शहरातील सत्ताधारी क्षीरसागरच्या परिवारातील सावळा गोंधळ व त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा पासून वंचित ठेवले जात आहे. तसेच कोणतीच सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली जात नाही तर शंभर टक्के सत्ताधारी फक्त राजकारण करतात त्यामुळे त्यांना कंटाळून परिवर्तनाची आस मनात धरत आहेत. बीडकरांना सक्षम पर्याय हा शिवसंग्राम आहे त्यामुळे बीड मधील नागरिकासहित युवा कार्यकर्ते व नेते यांच्यामध्ये शिवसंग्राम बाबत एक चांगली भावना निर्माण होत आहे याचाच एक भाग म्हणून युवा नेते सुशील कांबळे यांनी शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश करत आपल्या भावना व्यक्त केल्या. बीड शहरातील नगरसेवकांना गुलाम बनून त्यांच्या माध्यमातून जनतेला गुलाम बनवले जात आहे.

याच्या विरोधात शिवसंग्राम नेहमीच आवाज उठवत आहे म्हणून तरुणांमध्ये शिवसंग्राम हा आकर्षणाचा बिंदू ठरत आहे त्यामुळे अनेक मान्यवर शिवसंग्राम मध्ये प्रवेश करत आहे. शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ. विनायकरावजी मेटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्याच्या उपस्थितीत बार्शी नाका परिसरातील शिवसंग्रामचे नेते हनुमंत पवार , सातिराम ढोले व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रयत्नाने अशोक नगर, बार्शी नाका, प्रभाग क्रमांक 25 मधील युवा कार्यकर्ते सुशीलआप्पा कांबळे यांनी शिवसंग्राम पक्ष संघटनेत जाहीर प्रवेश केला..

याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीद ,युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैय्या मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिलभाऊ घुमरे, ऊसतोड कामगार नेते बबनराव माने, माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, ओबीसी आघाडीचे शिवराम शिरगिरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोटुळे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय माने, युवक शहर उपाध्यक्ष अनिकेत देशपांडे, पाली जि प गटप्रमुख अँड.गणेश मोरे, शिवसंग्राम नेते ऋषिकेश सुरवसे, युवा नेते मुकुंद गोरे, अल्पसंख्यांक नेते तथा वाहतूक आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष फारुख भाई व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post