इंटरनॅशनल शाळेजवळ इंटरनॅशनल खड्डे बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत..!
परळी प्रतिनिधी
परळी पासून जवळच असलेल्या तळेगाव येथे दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल आहे. या इंटरनॅशनल शाळेजवळ समोरून जाणाऱ्या राज्य रस्त्यावर इंटरनॅशनल प्रकारचे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवायचे कसे हा एक प्रश्न वाहनधारका पुढे पडत असतो. खड्डे चुकवण्याच्या नादात या ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. दरम्यान अनेक वर्षापासून एखाद्या मोठे मोठे होत आहेत तरी बांधकाम विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचेच दिसत आहे.
परळी पासून जवळच असलेल्या तळेगाव येथे परळी बीड रोडवर डाव्या बाजूने दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल आहे. या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना येणे जाणे करावे लागते. सर्वच विद्यार्थी स्कूल बस मधून येत नसतात. अनेक पालक आपल्या पाल्यांना मोटरसायकल वरून शाळेत आणून सोडत असतात. या शाळेसमोरूनच परळी बीड हा राज्य रस्ता जातो या रस्त्यावरून 24 घंटे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
शाळेसमोर असणाऱ्या रस्त्यावर एका मागे एक असे चार मोठे खडे पडले आहेत. एक खड्डा चुकला तर दुसरा खड्डा समोर लगेच येतो. त्यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. शाळेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांचे जीवन लक्षात घेता हे पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवण्याची गरज आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून या इंटरनॅशनल खड्ड्यांची संख्या वाढत आहे.
या रस्त्यावर एकाच जागेवर मागे पुढे सलग चार खड्डे आहेत. या खड्ड्यांचा फोटो घेत असताना या ठिकाणी असलेल्या स्थानिक रहिवाशांनी आणखी या रस्त्याच्या मागेपुढे खड्डे पडून धोका निर्माण होण्याचा संभव असल्याचे आम्हाला सांगितले. त्यामुळे किमान ज्या भागात शाळा महाविद्यालय आहेत अशा ठिकाणचे रस्ते तरी चांगले आणि खड्डे मुक्त असले पाहिजेत याकडे बांधकाम विभागाने लक्ष दिले पाहिजे. आपल्या मुलांना कोणताही धोका होऊ नये यासाठी किमान आवाज तरी उठवला पाहिजे







Post a Comment