परळी तालुक्यातील विविध शाळेत पोलिस करताहेत मार्गदर्शन..!

परळी तालुक्यातील विविध शाळेत पोलिस करताहेत मार्गदर्शन..!


परळी येथील ग्रामीण पोलीस स्टेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी देत आहे आत्मनिर्भरतेचे धडे..!


परळी विशेष प्रतिनिधी पदमाकर उखळीकर 

तालुक्यातील धारावती येथील जि.प.प्रा.शाळेत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना परळी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने शस्त्रांची माहिती देण्यात आली तसेच स्वसंरक्षणासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांनी मार्गदर्शन केले. प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांच्या कल्पकतेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनोखा उपक्रम राबविला जात आहे.


गेल्या काही दिवसांपासून परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तालुक्यातील विविध शाळेत जाऊन पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी शस्त्रांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येत.

यावेळी बीड जमादार गित्ते, पो.नाईक हरेगावकर, अमलदार डोरनाळे यांनीसुद्धा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे भेट देऊन मार्गदर्शन केले व, शस्त्राच्या संबंधाने, सायबर गुन्हेगारी, बाल लैंगिक, ट्रंँफिकबदृदल माहिती दिली. तसेच हर घर झेंडा ! हरघर तिरंगा ! येत्या काळात फडकवण्याचे आव्हान करण्यात केले.

तसेच, बीट अधिकारी पीएसआय पोळ, व जमादार पुरी यांनी वाघबेट, बेलंबा, कौठळी या गावातील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन झेंडावंदनाचे महत्त्व समजून सांगितले.

तसेच, बीट जमादार टोले व चेमटे यांनी कन्हेरवाडी या गावातील सोमेश्वर विद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थ्यांना पोलिसांबद्दल भीती न राहता आपुलकी निर्माण झाली आहे तसेच शस्त्रांसंबंधी मार्गदर्शन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post