सार्वजनिक भगवान बाबा जयंती उत्सव समितीची कार्यकारीणी जाहिर..!
तालुकाध्यक्ष पदी रघुनाथ फड व शहराध्यक्षपदी नितीन बागवाले..!
परळी वैजनाथ प्रतिनिधी
राष्ट्रसंत श्री भगवान बाबा महाराज सार्वजनिक जयंती उत्सवाची कार्यकरीणी जाहिर करण्यात आली. तालुकाध्यक्ष पदी रघुनाथ फड तर शहराध्यक्ष नितीन बागवाले यांची निवड करण्यात आली दरम्यान भगवान बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून शहरातून भव्य दिव्य मिरवणुक व शोभा यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहीती फड व बागवाले यांनी दिली आहे.
जयंती उत्सव समितीची उर्वरीत कार्यकारीणी अशी की, मुख्य सचिव- पप्पु (राणा) मुंडे, उपाध्यक्ष कृष्णा बावने, निलेश वाघमारे, गोटू गित्ते, अभिजीत धाकपाडे, पवन अंधारे, मुख्य सचिव चेतन बागवाले, जगनाथ फड, राज गित्ते, लाला गित्ते आदींची निवड करण्यात आली. दरम्यान दि.१६ ऑगस्ट रोजी राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या प्रतिमेची परळी शहरातून भव्य-दिव्य मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत भााविक भक्त व नागरीकांनी मोठ्या संख्ये सहभागी व्हावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.




Post a Comment