राज ठाकरेंच्या "शिवतीर्थ" न्यायालयाची शाखा आता परळीत-वैजनाथ कळसकर..!

राज ठाकरेंच्या "शिवतीर्थ" न्यायालयाची शाखा आता परळीत-वैजनाथ कळसकर..!


परळी प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदूजननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना प्रदेशाध्यक्ष दिलीप (बापू) धोत्रे, मनसे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे, मनसे राज्य उपाध्यक्ष अशोकभाऊ तावरे, प्रवक्ते प्रकाश काका महाजन, महीला आघाडी राज्य उपाध्यक्षा वर्षा ताई जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, बीड जिल्हाध्यक्ष सुमंतजी धस, महीला आघाडी बीड जिल्हाध्यक्षा रेखाताई अंबुरे, मनविसे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश भैया जाधव, परळी तालुका अध्यक्ष श्रीकांतजी पाथरकर आदी बीड जिल्ह्य़ातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनसे परळी शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली, दि.16 ऑगस्ट 2022 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदूजननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या "शिवतीर्थ" जनतेचे न्यायालय याची शाखा आपल्या परळीशहरात "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय अरूणोदय मार्केट परळी वैजनाथ येथे मनसेचे नेते दिलीप बापु धोत्रे यांच्या हस्ते सुर करण्यात आली.


मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना प्रदेशाध्यक्ष सन्माननीय दिलीप(बापू)धोत्रे यांच्या शुुभहस्ते "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले असून, या कार्यालयाच्यां माध्यमातून परळी शहरातील जनसामान्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नावर कामे केली जातील वैजनाथ कळसकर मनसे शहर अध्यक्ष परळी वैजनाथ तसेच या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परळी, अंबाजोगाई, केज तालुक्यातील उपजिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहध्यक्ष, शहर सचिव, तालुका उपाध्यक्ष, सर्कल आध्यक्ष, शाखाध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक, तसेच तिन ही तालुक्यातील सर्व अंगीकृत पदाधिकारी ज्यामधे विद्यार्थी सेना, महिला आघाडी, सहकार सेना, शेतकरी सेना, वाहातुक सेना, स्वयंरोजगार सेना, रस्ते आस्थापन सेना यांचे सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली.


या प्रसंगी मनसेचे परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर व परळीशहर अध्यक्ष कळसकर यांच्यासह तालुका उपाध्यक्ष विठ्ठलदादा झिलमेवाङ, नवनाथ कदम, श्रीहरी दहिफळे, गणेेश गित्ते, श्रीमंत फड, परळीशहर सचिव डॉक्टर अशोक मंत्री, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, गणेश चव्हाण, सुमित कलशेट्टे, महेश शिवगण, ऋषिकेश बारगजे, मनविसे शहर अध्यक्ष हनुमान सातपुते, शाखाध्यक्ष धनराज आवाड, माणिक लटिंगे, ॲड.अर्जुन सोळंके, सिद्धार्थ लांडगे, बालाजी चुणचुणे, सुनील भोसले, डाॅ.रामलींग घनचेकर, कोंडीबा कुकर, सुहास विर, धनंजय गाडवे, सोमनाथ राजनाळे, किशोर कुरे, काशीनाथ कापसे, शिवराज सोनटक्के, अभिषेक नागरगोजे, अनिल म्हस्के, नरेश नागरगोजे, आबा गित्ते, प्रशांत नागरगोजे, दिनेश फड, गणेश नागरगोजे, पार्थ नागरगोजे आदीउपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post