श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त डॉ.भागवताचार्य तुकाराम शास्त्री मुंडे महाराज यांचे विद्यावर्धिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक विषयावर मार्गदर्शन..!
परळी प्रतिनिधी
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यावर्धिनी विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी झाली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्या महाराष्ट्रातील गाजलेले प्रसिद्ध भागवताचार्य डॉ.तुकाराम शास्त्री मुंडे महाराज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण व सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराजांचा सत्कार शाळेचे संचालक श्री.भिंगोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे।मुख्याध्यापक श्री.मातेकर यांनी केले व शाळेत साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला.
यानंतर मुंडे महाराजांनी विद्यावर्धिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक विषयावर अतिशय साध्या, सोप्या पण विनोदपूर्ण भाषेत मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण नटखट होता पण कृष्णाचे आपल्या आई बद्दल असलेले प्रेम महाराजांनी सांगून आताच्या मुलांचे वागणे कसे असावे ते सांगितले. तसेच आपण आपल्या आईवडिलांचा आदर करावा असे सांगितले. महाराजांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील महत्वाची पंचसूत्री सांगून त्या पंचसूत्रीचा अवलंब जीवनात करण्यास सांगितला. विद्यार्थ्यांचे जीवन कसे असावे व विद्यार्थ्यांसाठी त्यांचे आई-वडील करत असलेल्या कष्टाची जाण मुलांनी ठेवावी असे त्यांनी विद्यार्थ्याना सांगितले. या कार्यक्रमाला शाळेचे सचिव श्री.ईटके, संचालक श्री.भिंगोरे साहेब,श्री.एम.टी.मुंडेसाहेब, श्री.चेवले साहेब, मुख्याध्यापक श्री.मातेकर सर व श्री.सुमठाणे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हंगरगे सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय कराड सर, विजय मुंडे, खांब सर, यादव सर, राजेश मुंडे, तिळकरी सर, बोतकुलवार सर, हंगे सर, जोशी मॅडम, पैंजणे मॅडम, गायकवाड मॅडम, श्री.सूर्यवंशी, श्री.कुलकर्णी, श्री.आत्माराम मुंडे, श्री मोटे, श्री.डोंगरे आदींनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन श्री नीला सर यांनी केले.



.jpg)


Post a Comment