सकारात्मक विचार पेरणारे रानबा गायकवाड यांचे आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात हे पुस्तक जगभरातील वाचकांसाठी ॲमेझॉन वर उपलब्ध..!

सकारात्मक विचार पेरणारे रानबा गायकवाड यांचे आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात हे पुस्तक जगभरातील वाचकांसाठी ॲमेझॉन वर उपलब्ध..!


परळी प्रतिनिधी

सकारात्मक विचारांची पेरणी करणारे आणि प्रत्येक माणसाचे मनोबल वाढविणारे सुप्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड यांचे आत्महत्यांनी प्रश्न सुटत नसतात हे पुस्तक आता जगभरातील वाचकांसाठी ॲमेझॉन क्विंटल वर उपलब्ध झाली असून वाचकांनी या पुस्तकाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जगभरातील डिजिटल वाचकांची वाचनाची तहान भागवणाऱ्या ॲमेझॉन किंडल या ई-बुक रिडरवर आता परळीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक-संपादक रानबा गायकवाड यांचे 'आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात 'हे पुस्तक उपलब्ध झाले आहे. आत्महत्या या भीषण समस्येची कारणमीमांसा करून सकारात्मक विचार पेरणारे रानबा गायकवाड यांचे 'आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात' हे पुस्तक महत्वपूर्ण आहे. 

अस्वस्थ वर्तमान, अंधःकारमय भविष्य, नैराश्य, भीती, व्यसनाधीनता, बेरोजगारी, अज्ञान, अंधश्रद्धा यातून आत्महत्या घडत आहेत. रानबा गायकवाड यांनी या वैश्विक समस्येची चिकित्सक मांडणी प्रस्तूत ग्रंथात केली आहे.आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात हे प्रेरणादायी मराठी पुस्तक आता जगभरातील वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

अमेझॉन किंडलवर हे पुस्तक वाचता येणार आहे.एकदा विकत घ्या, कधीही, कुठेही वाचा’ या तत्त्वावर काम करणारे किंडल रिडर जगभरातील वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत.या पुस्तकांच्या यादीत रानबा गायकवाड यांचे आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात हे पुस्तक दाखल झाले आहे. ही अभिमानास्पद घटना आहे.

आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात
या मनोधैर्य वाढविण्यासाठी उपयुक्त ग्रंथाची लिंक उपलब्ध करून देत आहोत.


जास्तीत जास्त वाचकांनी हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करून वाचावे . व इतरांनाही वाचण्यासाठी प्रेरित करावे असे आवहान लेखक रानबा गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post