नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाला सेलिब्रिटींची साद..!
विशेष प्रतिनिधी पदमाकर उखळीकर
शहरात गेल्या अनेक वर्षापासून नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेनुसार गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतू, कोरोना काळामध्ये गणेशोत्सव घेता आला नाही.पण दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्याच उत्साहात परळी येथे गणेशोत्सव साजरा होत आहे. नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या गणेशोत्सवाचे उद्घाटन दि.३१/०८/२०२२ रोजी , गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी होणार आहे. या उद्घाटन समारंभाला आ.धनंजय मुंडे, बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री, सिनेतारका श्रद्धा कपूर आणि विविध सुप्रसिद्ध सिनेतारका यांच्या उपस्थितीत होणार आहे. गणेश मूर्ती स्थापनेपासून म्हणजे दि.३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत दररोज सायं. ७ वा. परळी शहरातील मोंढा मैदानात विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
या गणेशोत्सवाला साद घालण्यासाठी चंद्रमुखी म्हणून घराघरात पोहोचलेली सुप्रसिद्ध मराठी सिनेतारका अमृता खानविलकर, सुप्रसिद्ध सिनेभिनेत्री सोनाली कुलकर्णी तसेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या सुप्रसिद्ध अभिनेत्रींनी ३१ ऑगस्ट रोजी परळीत होणाऱ्या गणेशोत्सवासाठी विशेष व्हिडिओ तयार करून, शेअर केला आहे. या गणेशोत्सवाला येण्याची साद घातली आहे.
"कोविड नंतर गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे आणि या उत्सवाला खास बनविण्यासाठी मा.धनंजय मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ गणेशोत्सवाला आम्ही येणार आहोत तुम्ही पण या अशी साद व्हिडिओ शेअर करून घातली आहे." त्यामुळे नाथ प्रतिष्ठान आयोजित आ. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या गणेशोत्सवाची उत्सुकता परळी,बीडसह राज्यातील जनतेला लागली आहे



.jpeg)



Post a Comment