मौजे सुर्डी सोनेसांगवी नवीनच झालेल्या मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे..!

मौजे सुर्डी सोनेसांगवी नवीनच झालेल्या मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे..!

कंत्राटदारावर कार्यवाही करा अन्यथा आंदोलन करणार-संभाजी ब्रिगेड..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

केज तालुक्यातील सुर्डी फाटा ते सुर्डी सोनेसांगवी या मुख्यमंत्री सडक योजनेतुन झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बीड यांना निवेदन देण्यात आले आहे.


याविषयी सविस्तर वृत्त असे की मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ते विकास संस्था बीड प्याकेज क्र.ADBBEE09 कार्यारंभ आदेश दि.२४/०३/२०२१ असून या कामावर १९४.७५ लक्ष रुपये खर्च करून दि.२३/०३/२०२२ ला हे काम पूर्ण झाले असल्याचे बोर्ड लावनेत आला आहे सदरील ठेकेदाराने या कामामध्ये साईडपट्टी न भारता व डाबर थर (सिल्कोट) न करता काम पूर्ण झाल्याचा बोर्ड लावलेला आहे परिणामी फक्त २ महिन्यातच सदरील काम निष्कृष्ट असल्यामुळे पावसाळ्या पूर्वीच रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे की, मौजे सुर्डी फाटा ते सोनेसांगवी येथील डांबरीकरनाणे रस्त्याचे काम व या रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे आहे सदरील पुलाच्या कामात हलगर्जी पणाने झाले असून सदरील रस्त्याचे काम फक्त खडी हातरून वरील बाजूस थोडेसे डांबर टाकून रस्ता काम केल्याचे दाखविले जात आहे. सदरील कामात लाखो रुपयाचा भ्रष्ट्राचार झाल्याचा अंदाज आहे.

सदरील काम हे निकृष्ठ दर्जाचे झाले असून सदरील काम करणा-या ठेकेदाराच्या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे. तरी सदरील रस्ता व पुलाच्या कामात निकृष्ठ झालेल्या कामाची चौकशी करून झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करावी व समंदीत ठेकेदार व अधिकारी यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी व याची दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा खणखणीत इशारा निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक भिसे, कोषाध्यक्ष रामराजे गलांडे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post