संभाजी ब्रिगेड बूथ बांधणी व संवाद बैठकीचे आयोजन - जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर..!

संभाजी ब्रिगेड बूथ बांधणी व संवाद बैठकीचे
आयोजन-जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर..!


बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संभाजी ब्रिगेड कडून बूथबांधणी व संवाद बैठकीचे आयोजन करण्यात येत असून प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व त्यांची सर्व कार्यकारिणी यांच्याशी संवाद साधून बूथ बांधणी करण्यात येणार आहे. आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने खंबीरपणाने निवडणुका लढवण्यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे.

त्याकरिता पक्षांतर्गत तयारी म्हणून येणाऱ्या निवडणुकांची रणनीती ठरवण्याच्या संदर्भामध्ये तालुका निहाय बूथ बांधणी करीता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. लवकरच तालुका निहाय तारखा जाहीर करण्यात येतील अशी माहिती बीड जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post