अश्विनी कापरे या बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलीचा भाटु़ंब्यात रात्री दुर्दैवी मृत्यू..!
केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे
केज तालुक्यातील भाटुंबा येथील बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीचा रात्री 11 वाजता घराच्या जवळच सर्पदंश होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत असलेल्या व अभ्यासामध्येही हुशार असलेल्या या मुलीच्या मृत्यूने गावात आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
केज तालुक्यातील मौजे भाटुंबा येथील अनंत कापरे यांची मुलगी अश्विनी अनंत कापरे हिला शनिवारी रात्री आकरा वाजता घराजवळ सर्पदंश झाला. तीच्या कुटुंबियांनी तीला तातडीने केज येथील दवाखान्यात दाखल केले परंतु केज मधून अँब्युलंसने अंबेजोगाई येथील दवाखान्यात घेऊन जात असतानाच निधन झाले. अंबेजोगाई येथील दवाखान्यात शवविच्छेदन करून आज तीचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला असून अत्यंत शोकाकूल वातावरणात भाटुंबा येथे तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.




Post a Comment