वडखेल येथील मोकाट जनावरांच्या धडकेत गाय विहीरीत पडली..!
परळी प्रतिनीधी
परळी तालुक्यातील वडखेल येथील मोकाट जनावरांचा उच्छाद सुरुच असुन बुधवार दि.21 रोजी गोविंद रामभाऊ आगलावे यांच्या गायीला या मोकाट जनावरांनी धडक दिल्याने 40 फुट खोल विहीरीत पडली. गावकर्यांनी जेसीबीच्या सहाय्याने या गायीला वर काढले. वडखेल येथील दहा वर्षापुर्वी एका भाविकाने सिधोबा देवाला सोडलेल्या एका कालवडीपासुन सध्या 15 गायी व कठाळ्यांचा कळप बनला आहे.
या जनावरांना शेतीची कामे नसल्याने सकाळी दिसेल त्या शेतात जावुन पिके खाने, दिवसभर पिकांची नासधुस करणे व शेतकर्यांच्या बांधलेल्या बैलावर,चालत्या बैलगाडीवर हल्ला करणे एवढेच नव्हे तर या जनावरांना हाकालण्यास गेलेल्या व्यक्तीवर हल्ला केला जात असल्याने वडखेलचे ग्रामस्थ वैतागून गेले आहेत. यातच बुधवार दि.21 सप्टेंबर रोजी गोविंद रामभाऊ आगलावे यांनी आपली गाय शेतातील आखाड्यावर बांधली असता पाच ते सात मोकाट जनावरांनी त्या गायीवर हल्ला केला. यात ती गाय शेजारी असलेल्या पन्नास फुट विहीरीत पडली. गावकर्यांनी दोन तास परिश्रम घेत जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले. यामध्ये सदरील गाय गंभीर जखमी झाली आहे.




Post a Comment