लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या प्रवृत्तीस रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेड व शिवसेनेची युती कटिबध्द असेल-सौरभदादा खेडेकर..!
बीड प्रतिनिधी साचीन साखरे
संभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्ह्याची आढावा बैठक शासकिय विश्रामगृह येथे दि.१८ सप्टेंबर२०२२ रोजी घेण्यात आली. यावेळी शिवश्री सौरभदादा खेडेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की "लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी जी प्रवृत्ती आपल्या देशामध्ये गोंधळ माजवत आहे, त्या प्रवृत्तीस रोखण्यासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये संभाजी ब्रिगेड व शिवसेनेची झालेली युती ही भक्कमपणाने काम करेल."
"होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात त्याकरिता वाट न पाहता सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आलेली असून यामध्ये कसूर व्हायला नको. त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी दक्ष राहणे खूप गरजेचे आहे" असेही पुढे बोलताना ते म्हणाले.
या बैठकी दरम्यान संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री अभिमन्यु पवार, प्रदेश सहसंघटक शिवश्री मनोज गायकवाड़, संघटक शिवश्री शशिकांत कन्हेरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख तथा प्रदेश संघटक शिवश्री सुदर्शन तारख, मराठवाडा अध्यक्ष राहुल भैय्या वायकर यांनी केलेल्या मार्गदर्शनातून येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची ऊर्जा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बैठकी दरम्यान मिळाली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष (पूर्व) शिवश्री प्रवीण ठोबरे सर, जिल्हाध्यक्ष (मध्य) शिवश्री विजय दराडे, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) शिवश्री महेंद्र मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव, परळी तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, आंबेजोगाई तालुकाध्यक्ष शिवश्री संभाजी घोरपडे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री प्रा.गजानन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अरबाज शेख, गणेश गवळी, शहराध्यक्ष जीवन घोलप, तालुका अध्यक्ष राहुल डावकर, जिल्हा संघटक रंगनाथ फाटक, तालुका उपाध्यक्ष अशोक तुपे, बळीराम शिंदे, राजेश बनकर यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment