नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरूच, भरधाव टँकरच 15 ते 16 गाड्यांना धडक..!
पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरु आहे. नवले ब्रिज अपघाताचा हॉटस्पॉट ठरला असून शनिवारी (दि.20) रात्री भीषण अपघात झाला आहे. एका मोठ्या टँकरने 15 ते 16 गाड्यांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे नवले ब्रीजवर वाहतूक कोंडी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
नवले ब्रीजवर शनिवारी रात्री एका मोठ्या टँकरने 15 ते 16 गाड्यांना जोरात धडक दिली. या अपघातात चारचाकी गाड्यांसह दुचाकींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जीवघेणा उतार, सुरक्षिततेच्या सुविधांचा अभाव आणि वेगावरील नियंत्रणाकडे वाहन चालकांचे दुर्लक्ष अशा कारणांमुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पूल ते नऱ्हे दरम्यानचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. आजपर्य़ंत याठिकाणी अनेक अपघात झाले असूने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.




Post a Comment