जिजामाता उद्यान येथील आऊसाहेब जिजाऊंचा पुतळा सुशोभीकरणामुळे झाकून ठेवला होता तो खुला करण्यात यावा..!

जिजामाता उद्यान येथील आऊसाहेब जिजाऊंचा पुतळा सुशोभीकरणामुळे झाकून ठेवला होता तो खुला करण्यात यावा..!

संभाजी ब्रिगेडची न.प.कडे निवेदनाद्वारे मागणी
 

परळी वैजनाथ प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उद्यानात आऊसाहेब जिजाऊ यांचा पूर्णाकृती पुतळा असून उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामानिमित्त हा पुतळा झाकण्यात यावा अशी दीड वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी केली होती व नगरपरिषदेने ती मागणी मान्य करत जिजाऊंचा पुतळा झाकून ठेवला होता. आता उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम बऱ्यापैकी पूर्णत्वास गेले आहे.

त्यामुळे आता पुतळ्यावरील अवरण काढून पुतळा खुला करायला काही अडचण नसल्यामुळे तो पुतळा खुला करावा. तसेच चबुतरा व पुतळ्याच्या आजूबाजूचे सुशोभीकरण करून स्वच्छता करण्यात यावी. आजूबाजूला छोटे छोटे गवत उगवली आहेत तेही काढून घेऊन पुतळा खुला करण्यात यावा. अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे नगर परिषदेला मागणी केली आहे. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post