सचिन साखरे, नारायण मुंडे, अविनाश वाघीरकर, सय्यद मुजाहिद लतीफ, गोविंद केंद्रे, बापुसाहेब ( बंडु )गित्ते, श्रीकांत चाटे,ह भ प बापुसाहेब महाराज खवणे यांना दै.सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार 2022 जाहीर

सचिन साखरे, नारायण मुंडे, अविनाश वाघीरकर, सय्यद मुजाहिद लतीफ, गोविंद केंद्रे, बापुसाहेब बंडु गित्ते, श्रीकांत चाटे, ह.भ.प.बापुसाहेब महाराज खवणे यांना दै.सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार  2022  जाहीर..!



परळी वैजनाथ प्रतिनिधी

सामान्य माणसाला स्वातंत्र्य,समता, बंधुता, सामाजिक न्यायाची शिकवण व व्यक्तीहिता सह  राष्ट्रहिताला प्राधान्य देत सक्षम माणूस घडविणारा संस्कार देणारे लोकप्रिय दै.सोमेश्वर साथी, परळी वैजनाथ जिल्हा बीड.येथून प्रकाशित होणार्‍या दै सोमेश्वर साथी च्या वर्धापन दिनानिमित्त दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी दै.सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार-2022 चे  जाहीर करण्यात आले आहे.

१) सचिन धनराज साखरे केज, युवा उद्योजक तथा पत्रकार केज जिल्हा बीड

२) नारायण माधवराव मुंडे उद्योजक तथा सामाजिक कार्य परळी वैजनाथ

३) अविनाश वासुदेवराव वाघिरकर जिल्हा प्रतिनिधी दैनिक पुण्यनगरी बीड तथा सामाजिक कार्य

४) सय्यद मुजाहिद लतीफ ज्युनियर इंजिनियर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंबाजोगाई,

५) गोविंद महाराज केंद्रे दैनिक पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी घाटनांदुर तथा सामाजिक कार्य

६) बापूराव (बंडू तात्या) किशनराव गित्ते सामाजिक कार्य तळणी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड 

७) श्रीकांत भास्करराव चाटे उद्योजक तथा सामाजिक कार्य परळी वैजनाथ जिल्हा बीड

८) ह.भ.प.भागवताचार्य बापूसाहेब महाराज खवणे अध्यक्ष ज्ञानही गुरुकुल सेलू आदि मान्यवरांना जाहीर करण्यात आले आहे.

मागील वर्षी प्रमाणे या ही वर्षी कला, क्रीडा, उद्योग, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, संगीत,अशा विविध जीवनक्षेञात विशेष योगदान देणार्‍या व्यक्ती,संस्थांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

हा पुरस्कार प्रदान सोहळा दै.सौमेश्वर साथी चे संपादक बालासाहेब फड यांच्या संकल्पनेतून साकारला आहे.वृतपञाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे हे एक अग्रगण्य दैनिक. समाजात विधायक कार्य करणार्‍या व्यक्तींना, संस्थांना सन्मानित करण्याच्या हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक अरुण मराठे , प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते अनिल मोरे, श्री प्रताप भैय्या देशमुख मा. प्रथम महापोर परभणी, श्री मोहनरावजी आव्हाड साहेब मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र  परळी वैजनाथ,मा.डाॅ. वर्षा पुनवटकर शिक्षिविद साहित्यक वर्धा,या.सुरेश.अ.हिवराळे सहनिर्माते संविधान एक रास्ता, संगिता जामगे साहित्यिक व जेष्ठ समाजसेविका गंगाखेड,  स्वागताध्यक्ष एकता चे संस्थापक अध्यक्ष अजमत खान,अरूण पडघम, अध्यक्ष निवड समिती संपादक बालासाहेब फड आदि मान्यवर उपस्थित  असणार आहेत.

सदरील सोहळा स्थळ,सिटी पॅलेस हाॅटेल सभागृह परभणी येथे मान्यवरांचे, नारायण चाळ, स्टेशन रोड परभणी दि २० नोव्हेंबर २०२२ रोजी वार रविवार रोजी २:३० वाजता उपस्थितीत  संपन्न होणार.

Post a Comment

Previous Post Next Post