संपादक मोहन वाव्हळे यांची दुचाकी चोरी प्रकरणी होणार असलेल्या घंटानाद आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा-शिवश्री देवराव लुगडे महाराज..!

संपादक मोहन वाव्हळे यांची दुचाकी चोरी प्रकरणी होणार असलेल्या घंटानाद आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा-शिवश्री देवराव लुगडे महाराज..!


परळी प्रतिनिधी

येथील पीसीएन न्यूज/साप्ताहिक संघर्ष नेताचे संपादक मोहन वाव्हळे यांची दुचाकी 8 नोहेंबार रोजी चोरीला गेली त्या दुचाकीचा आजपर्यंत तपास लागलेला नाही. या चोरीच्या घटनेच्या विरोधात होणार असलेल्या घंटानात आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा असून त्या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड सक्रिय सहभागी होईल असे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. मागच्या अनेक महिन्यापासून परळी शहारा मध्ये पोलीस यंत्रणेचा पूर्णपणे ढिसाळ कारभार झालेला असून पोलीस यंत्रणा कोलमडली आहे. परळी शहरांमध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत पण संबंधित घटनांचा तपास अजून पर्यंत लागलेला नाही. मागच्या पंधरा दिवसांमध्ये घरपोड्या, काही दुचाकी, काही ठिकाणी दुकान फोडीच्या घटना घडलेल्या आहेत. परळी संभाजीनगर व शहर पोलीस स्टेशनचे कसल्याही प्रकारचे नियंत्रण या शहरावर राहिलेले नसून येथे चोरांचेच राज्य आले का काय ? अशा पद्धतीची शंका व प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे याचा मेळ लागत नाही. परळी शहरामध्ये बंद पडलेल्या सीसीटीव्हीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने मागच्या वर्षी आवाज उठवला होता. त्यावेळेला आम्हाला आश्वासन पण दिले गेलं की लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे चालू होतील पण आजपर्यंत परळी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे चालू झाले नाहीत. सीसीटीव्ही शोभेचेच झाले असल्याचं दिसून येत आहे. परळी पोलीस यंत्रणा यांनी पूर्णपणे गांभीर्याने सर्व प्रकरण घेऊन चोरांवर वचक मिळवावा व अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण परळीची सुरक्षा ही पोलिसांच्याच हातात असून पोलिसांचे जर नियंत्रण अशा पद्धतीने सुटत असेल तर हे दुर्दैवी आहे. संपादक मोहन वावळे यांच्या दुचाकी चोरी संदर्भात होणार असलेल्या घंटानात आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा असून त्या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड पूर्णपणे सहभागी होणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post