कृपासिंधू सेवाभावी संस्थेच्या वतीने, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरचे चेअरमन श्री महेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली भक्त निवास येथे 'महाप्रसाद' सोहळा..!
अक्कलकोट प्रतिनिधी
कृपासिंधू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ.संध्या चिखले, सचिव अमोल वाळके पाटील, खजिनदार सौ प्रिया भोसले हे उपस्थित होते.
या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभणाऱ्या विविध क्षेत्रातील व विविध राज्यातून आलेल्या स्वामी सेवेकऱ्यांचे स्वागत श्री.महेश इंगळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच या कार्यक्रचे नियोजन श्री.विनोद अण्णा धायगुडे, बाळासाहेब धायगुडे, अतुल अप्पा शिर्के, प्रशांत धायगुडे, सुरज धायगुडे, बापूराव शिंदाळकर, अक्षय शिंदे, प्रतीक गायकवाड, सागर वाळुंज यांनी केले आणि या कार्यकमाचे सूत्रसंचालन श्री.अजयकुमार सावजी यांनी केले. तसेच श्री.महेश इंगळे यांनी विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल कृपाशिंधु सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळं व सन्मानचिन्ह देऊन ह्रदयसत्कार व आभार मानन्यात आले.




Post a Comment