महाराष्ट्रात प्रसिद्ध आनंदगावतील भव्यदिव्य खंडोबा मूर्ती सर्व जातीधर्मातील भाविकांचे श्रद्धास्थान..!

महाराष्ट्रात प्रसिद्ध आनंदगावतील भव्यदिव्य खंडोबा मूर्ती सर्व जातीधर्मातील भाविकांचे श्रद्धास्थान..!

वर्षानुवर्षेची चंपाषष्टीस यात्रामहोत्सवची परंपरा..!

घोष येळकोट येळकोट जयमल्हार


केज दि.२८/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे


केज तालुक्यातील आनंदगाव (सा) येथील खंडोबा देवस्थान सर्व जातीधर्माचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध भव्यदिव्य पंचधातुच्या मूर्ती चंपाषष्टी यात्रामहोत्सवाची अनेक वर्षांपूर्वीची परंपरा महाराष्ट्रातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः बाहेर गावी असलेल्याला लेकी माहेरी येतातच, डफ वारुचा नाद अन भंडारा उधळण हे येथील वैशिष्ट्य आहे.

आनंदगाव म्हणजे देवळाचं गाव म्हणून हि ओळखलं जातं गावात सर्वच देवतांची मंदिर आहेत धार्मिकतेचा वारसा आहे. गावचे कुलदैवत खंडोबा याबाबत बुजुर्ग व आख्यायिका यामधून पाथरा गावी पूर्वी मूळ खंडोबा होते त्या मूर्ती ची भक्तांकडून सेवा होत नसल्याने आनंदगावातील लोकांनी त्यांना वाजत गाजत गावी घेऊन आल्याचे सांगितले जाते.  

आनंदगावच्या वारुंची महाराष्ट्रात ख्याती 

आनंदगाव येथे वारू खेळणाऱ्या भाविकांची विशेषतः सर्वत्र ओळख आहे उत्कृष्ट सादरीकरण करून ठेका धरण्यात त्यांची ख्याती आहे.

पंचक्रोशीत भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत वारूमंडळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रति रविवारी महाआरती केली जाते वाघे मंडळी सेवेचे काम करतात. यात्रेपूर्वी एक महिन्यापासून मल्हारी माहात्म्य नावाचा ग्रंथ वाचन केले जाते. घटस्थापना करून नऊ दिवस उपवास धरले जातात पालखीची भव्य मिरवणूक वारू हलकी ढोलाच्या गजरात काढली जाते दिवट्या वर तेल घालण्याची मोठी परंपरा कायम आहे. बारागाड्या ओढणे कार्यक्रम होतो अजून विशेष म्हणजे पहाटेच्या वेळी वारुवाले सज्ज होऊन येळकोट येळकोट जय मल्हार घोष करून लंगर तोडतात. येथील यात्रेचे आकर्षण म्हणजे वाघ्या मुरळी कार्यक्रम यामधून प्रबोधन हि केले जाते.रात्री लोककला तमाशाचे फड घुंगरू वाजू लागते.

सामाजिक उपक्रमाची परंपरा व शिस्त 

खंडोबा यात्रेसाठी हजारो भाविक येतात भंडारा खोबरे उधळतात दर्शनासाठी शिस्त पाळतात. पूर्वी नाटकाची परंपरा मागील वर्षपासून बंद पडली. रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर, पशुप्रदर्शन तपासणी शिबीर, शेतकरी मेळावा घेऊन यातून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते

कुस्तीचा फड गजबजतो 

हजार पाचशे किलोमीटर अंतरावरून पैलवान कुस्तीसाठी येतात लहान पोरांपासून ते शेवटची महाकुस्ती जिंकणाऱ्या पैलवांची हातात चांदीचे कडे रोख बक्षीस देऊन गावभर मिरवणूक काढली जाते.

अशा विविध कार्यक्रमाने या भूमीचे नाव आनंदगाव प्रमाणे आनंदी होते. खेळणी, कपडे, खाद्यपदार्थ, नारळ, पानफुल दुकान व्यापारी येतात त्यामुळे मोठी उलाढाल होते पाच दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

Post a Comment

Previous Post Next Post