छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई..!
शैक्षणिक संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न..!
अंबाजोगाई प्रतिनिधी
दि.30 नोव्हेंबर 2022 रोजी जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान संचालित छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल अँड.ज्युनियर कॉलेज, अंबाजोगाई येथे वार्षिक क्रीडा महोत्सव सोहळ्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रमेशजी लोमटे सर, प्रशांतजी बर्दापूरकर सर (सकाळ वृत्तपत्राचे वार्ताहर), कु.ज्ञानेश्वरी शिंदे मॅडम (Silver Medalist in Commonwealth Games, London) तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड.माधव जाधव सर, ॲड.अनिल लोमटे सर, इंजि.परमेश्वर भिसे सर यांच्या उपस्थितीत वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये नयनरम्य संचलन, नृत्य, विविध खेळांमध्ये पदक प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन,तसेच कबुतराला आकाशात मुक्त करून खेळाडूंना खेळाचा मनसोक्त आनंद घेण्याचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी हा वार्षिक क्रीडा महोत्सव शिस्तीमध्ये राहून खेळाचा आनंद घेण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक/शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ यांनी आपले मोलाचे योगदान दिले.






Post a Comment