संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अश्विनीताई यादव तर उपाध्यक्षपदी पुष्पाताई कचरे यांची निवड..!

संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अश्विनीताई यादव तर उपाध्यक्षपदी पुष्पाताई कचरे यांची निवड..!


माजलगाव प्रतिनिधी

शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तथा बीड जिल्हा संपर्कप्रमुख डॉ.सुदर्शन तारक सर व विभागीय अध्यक्ष राहुल भैया वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान अंबाजोगाई येथील शिवमती अश्विनीताई सिद्राम यादव यांची महिला आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी तर जिल्हा उपाध्यक्षपदी पुष्पाताई कचरे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी बीड जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर, महेंद्र मोरे, विजय दराडे, जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव, अंबेजोगाई तालुकाध्यक्ष संभाजी घोरपडे,परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, अंबाजोगाई शहराध्यक्ष सिद्राम यादव, नारायणराव मुळे, दत्ता गंगणे, महिला आघाडी अंबाजोगाई तालुकाध्यक्ष सुनंदाताई लोखंडे, तालुका उपाध्यक्ष जमुनाताई सुरवसे, आंबड ताई, सारिका जोगदंड, अतुल सुरवसे, ऋषी भाकरे, शेख साहेब, अभिराज यादव, परमेश्वर मिसाळ, पोपटराव लोंढे, दत्ता गंगणे, केशव टेहरे, सतिश कुंडगर, निलेश महाजन यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे महत्त्वपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


या बैठकी दरम्यान परिपूर्ण जिल्हा कार्यकारिणी,परिपूर्ण सर्व तालुकाध्यक्ष, महिला आघाडी, विद्यार्थि आघाडी, दिव्यांग आघाडी सक्षम करण्यामध्ये परिपूर्ण ठरल्याबद्दल बीड जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर व जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांचा बीड जिल्हा संपर्क प्रमुख डॉ.सुदर्शन तारक सर व विभागीय अध्यक्ष ऍड.राहुल  भैया वायकर यांनी विशेष सत्कार केला. पक्षाने दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करत १५ जानेवारी पर्यंत सभासद नोंदणी पूर्ण करणार असल्याचा शब्द प्रवीण ठोंबरे यांनी सत्काराला उत्तर देताना दिला.

Post a Comment

Previous Post Next Post