इयत्ता 10 वी 12 च्या मुख्य परिक्षेच्या वेळेस विजेचा लपंडाव बंद करा-हनुमान सातपुते; मनसे विद्यार्थी सेनेची मागणी..!

इयत्ता 10 वी 12 च्या मुख्य परिक्षेच्या वेळेस विजेचा लपंडाव बंद करा-हनुमान सातपुते; मनसे विद्यार्थी सेनेची मागणी..!


परळी प्रतिनिधी

12 व 10 वीच्या बोर्डाच्या मुख्य परीक्षेला सुरूअसून परळी शहरातील व ग्रामीण भागात विजेच्या लपंडावामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्रास होत असून, राज्य शासन व महावितरणच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थी ही भारनियम मूळे भरडला जात आहे. तरी आमच्या मागणी नुसार लवकरात लवकर परळी शहर व ग्रामीण भाग लपंडाव बंद करून 24 तास विज उपलब्ध करून दिल्यास 12 व 10 वी च्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास कोणतीही अडचण येणार नाही ह्याची काळजी महावितरण यांनी घ्यावी. नसता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, संतोष भाऊ नागरगोजे, अशोक तावरे, मनविसे राज्य उपाध्यक्ष राजीव जावळीकर, अक्षय काशीद, मनसे वाहतूक राज्य उपाध्यक्ष रवि नेमाने, मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, यांच्या सुचणे वरून विद्यर्थी जिल्हाध्यक्ष गणेश काळे,मनसे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर याच्या नेतृत्वाखाली मनसे म.न.से स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे परळी शहराध्यक्ष हनुमान सातपुते, मनसे शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, गणेश चव्हाण, गोविंद डहाळे, विठ्ठल साखरे, ओमकार निकम, अर्जुन जाधव, आकाश माने, बालाजी जाधव सह आदींनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post