परळीला बॅनर मुक्त करून शहराचे विद्रूपीकरण थांबवा हि शराध्यक्षाची मागणी हवेत विरली..!

परळीला बॅनर मुक्त करून शहराचे विद्रूपीकरण थांबवा हि शराध्यक्षाची मागणी हवेत विरली..!

राष्ट्रवादीकडूनच असंख्य बॅनर लाऊन शहराचे विद्रोपीकरण होत असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप..!


परळी प्रतिनिधी

१ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी नगरपरिषदेला निवेदन देऊन परळी शहराला बॅनर मुक्त करून शहराचे बॅनरच्या माध्यमातून होणारे विद्रूपीकरण थांबवा अशी मागणी करण्यात आली होती. पण मागच्या अनेक वर्षापासून शहराचं खरं विद्रोपीकरण हे राष्ट्रवादी काँग्रेसच करत आहे.म्हणजे "सौ चूहे खाके बिल्ली चली हज" अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात आली होती. ही मागणीच मुळात हास्यस्पद असून या मागणीला १५ दिवसही उलटत नाही तोवर राष्ट्रवादी कडुन परळी शहरात बॅनरच्या माध्यमातून शहराचे विद्रूपीकरण सुरू झालं आहे. असे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून परळी शहरांमध्ये सातत्याने बॅनरच्या माध्यमातून विद्रूपीकरण थांबवा अशी मागणी केली ही मागणी योग्यच आहे. यात दुमत नाही पण सर्वात जास्त परळी शहरांमध्ये बॅनर हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच व त्यांच्या नेत्याचेच लागतात हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी विसरले वाटत.जनतेची दिशाभूल करण्यासाठी भावनेच्या भरात मागणी केली असल्याचा स्पष्ट आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे.

कोण काय बोलतं आणि काय करतं.? हे परळीकर जनता चांगल्या प्रकारे ओळखते. येणाऱ्या कालखंडामध्ये परळीची सुज्ञ जनता मतदानाच्या माध्यमातून दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी केल्याशिवाय राहणार नाही. असेही या प्रसिध्दी पत्रकात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post